अवैद्य दारू विक्री करताना पिंगुळीतील रंगेहाथ ताब्यात

कुडाळ | प्रतिनिधी

पिंगुळी म्हापसेकर तिठा येथे अवैद्य दारू विक्री करताना पिंगुळी नवीवाडी येथील संदीप गावडे याला पोलिसांनी २ हजार ७०० रुपयांच्या गोवा बनावटीच्या दारूसह पकडले.
कुडाळ पोलीस ठाण्याचे पोलीस टाकेकर, रामदास जाधव, अमोल महाडिक यांनी पिंगुळी म्हापसेकर तिठा येथील बेस्ट बेकरीच्या मागे अवैद्य गोवा बनावटीची दारू विकणाऱ्या संदीप गावडे यांच्यावर छापा टाकून सुमारे २ हजार ७०० रुपयांची गोवा बनावटीची दारू पकडली व संदीप गावडे यांच्याविरुद्ध पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला.