वेंगुर्ले भाजपा तर्फे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा वाढदिवस अनोख्या पद्धतीने साजरा

 

तालुक्यातील ९३ ही बुथ रचना पुर्ण करून वाढदिवसाची अनोखी भेट

बुथ संयोजक व शक्ती केंद्र प्रमुखांचा संघटन मंत्र्यांच्या हस्ते झाला सन्मान

वेंगुर्ले | प्रतिनिधी
जगातील सर्वाधिक लोकप्रिय नेता व देशाचे पंतप्रधान मान.नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त प्रदेशाध्यक्ष चंद्रकांतदादा पाटील यांनी महाराष्ट्रातील भाजपा कार्यकर्त्यांना आप आपल्या भागातील बुथरचना परिपूर्ण करण्याचे आवाहन केले होते .त्यानुसार समर्थ बुथ अभियान संपूर्ण महाराष्ट्रात राबवले. या अभियान अंतर्गत प्रत्येक बुथ वर बुथप्रमुख व ३० जणांची कमीटी बनविण्याचे उद्दीष्ट देण्यात आले होते. ह्या आवाहनाला प्रतीसाद देत वेंगुर्ले तालुक्यातील सर्व लोकप्रतिनिधी, पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी जोमाने काम करत तालुक्यातील ९३ ही बुथची रचना परिपूर्ण करुन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना वाढदिवसाची भेट दिली. त्यामुळे बुथ संयोजक व शक्ती केंद्र प्रमुखांचा संघटन मंत्री शैलेंद्र दळवी यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला.

सिंधुदुर्ग जिल्ह्यातही १४ मंडलामध्ये प्रथम बुथरचना पुर्ण करण्याचा मान वेंगुर्ले भाजपाचा
वेंगुर्ले भाजपा तर्फे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा वाढदिवस आज अनोख्या पद्धतीने साजरा करण्यात आला. भाजपा मध्ये बुथला अनन्यसाधारण महत्त्व आहे. ज्याठीकाणी बुथ मजबूत त्याठिकाणी पक्ष मजबूत अशा भावनेतून पक्षाचे काम चालते. त्यानुसार भाजपा ला सर्वत्र यश मिळत आहे. या बुथरचनेच्या जिवावर भाजपाने अनेक विजय पादाक्रांत केले आहे असे प्रतिपादन सरचिटणीस प्रभाकर सावंत यांनी केले. त्यामुळेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त पक्षाने कार्यकर्त्यांना हे लक्ष दिले होते. यावेळी वेंगुर्ले तालुक्याचे बुथ संयोजक व तालुका सरचिटणीस प्रशांत खानोलकर यांचा सत्कार करण्यात आला. तसेच तालुक्यातील २१ शक्ती केंद्र प्रमुखांनाही सन्मानित करण्यात आले.

” सेवा आणि समर्पण ” सप्ताहात लाभार्थी सन्मान कार्यक्रम : संघटन मंत्री शैलेंद्र दळवी
हे वर्ष पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या साठी महत्त्वाचे वर्षं आहे. कारण नरेंद्र मोदी हे राज्याचे मुख्यमंत्री व देशाचे पंतप्रधान म्हणून ७ ऑक्टोबर २०२१ ला जनतेच्या आशीर्वादाने जनसेवक म्हणून २० वर्षे पुर्ण करीत आहेत .लोकशाहीत लोकनेता ही संधी फार कमी लोकांना मिळत असुन मान.नरेंद्र मोदीजींची निरंतर वाढणारी लोकप्रियता दर्शवीत आहे. त्यामुळेच यावर्षी मान.पंतप्रधानांचा वाढदिवस जनसेवक म्हणून २० वर्षे कार्यकाल पुर्ण झाल्याचा सुखद योगायोग व आनंदी क्षण आहे. राष्ट्रीय अध्यक्ष जगत प्रकाश नड्डाजी यांच्या सुचनेनुसार दिनांक १७ सप्टेंबर ते ७ ऑक्टोबर या काळात “सेवा व समर्पण अभियान” विवीध कार्यक्रमाचे आयोजन करुन राबवीणार असल्याचे श्री. दळवी यांनी सांगितले. वेंगुर्ला तालुका कार्यालयात आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमाला जिल्हा सरचिटणीस प्रसंन्ना देसाई, नगराध्यक्ष राजन गिरप, तालुकाध्यक्ष सुहास गवंडळकर, जिल्हा चिटनीस अॅड सुषमा खानोलकर, जिल्हा उपाध्यक्ष सोमनाथ टोमके, जि.प.सदस्य प्रीतेश राऊळ, जि.का.का.सदस्य वसंत तांडेल, ता.सरचिटणीस बाबली वायंगणकर, जेष्ठ नेते प्रकाश रेगे, ता. उपाध्यक्ष लक्ष्मीकांत कर्पे, आय.टी.सेलचे केशव नवाथे, शिरोडा सरपंच मनोज उगवेकर, किसान मोर्चा चे बाळु प्रभु, ज्ञानेश्वर केळजी, नगरसेवक प्रशांत आपटे, ता.चिटनीस समीर चिंदरकर, युवा मोर्चा चे प्रणव वायंगणकर, ओबीसी सेलचे शरद मेस्त्री, रविंद्र शिरसाठ, महिला मोर्चा च्या रसीका मठकर, कार्यालय प्रमुख छोटु कुबल इत्यादी उपस्थित होते.

यावेळी शक्ती केंद्र प्रमुखांचा सन्मान करण्यात आला. त्यामध्ये वेतोरे – सुधीर गावडे, वायंगणी – शामसुंदर मुननकर, तुळस – संतोष शेटकर, मातोंड – दिपक परब, आरवली – महादेव नाईक, आसोली – विजय बागकर, अणसुर – गणेश गावडे, शिरोडा – विद्याधर ऊर्फ सतिश धानजी, परुळे – रुपेश