शैलजा सावंत यांची मंडणगड पोलीस स्थानकाचे पोलीस निरिक्षक पदी नियुक्ती

मंडणगड । प्रतिनिधी

पोलीस निरिक्षक शैलजा सावंत यांची मंडणगड पोलीस स्थानकाचे पोलीस निरिक्षक पदी नुकतीच नियुक्ती झाली आहे. या निवडीमुळे मंडणगड पोलीस स्थानकाचे इतिहासात पहिल्यादांच एक महिला, पोलीस ठाण्याचे प्रमुख या नात्याने या पदाची जबाबदारी सांभाळताना दिसून येणार आहे.

शैलजा सावंत यांनी यापुर्वी पुणे क्राईम ब्रँच, नवी मुंबई क्राईम ब्रँच येथे एक सक्षम अधिकारी म्हणून काम केले आहे.याशिवाय रत्नागिरी पोलीस दलात गुन्हे अन्वेषण विभागाचे काम पाहीले आहे. त्यांच्या मंडणगड येथील नियुक्तीनंतर विविध स्तरातून त्यांचे अभिनंदन होत आहे.

सर्वसामान्यांनासाठी चौवीस तास तत्पर- पोलिस निरीक्षक शैलजा सावंत
तालुक्यातील सर्वसामान्य जनतेसाठी मंडणगड पोलीस स्थानक चौवीस तास कार्यतत्पर राहणार असल्याचे शैलजा सावंत यांनी निवडीनंतर माध्यमांशी झालेल्या वर्तालापात स्पष्ट केले. येथील ग्रामिण भाग व डोंगऱाळ संरचना व संपर्काच्या साधनांचा अभाव ही स्थिती लक्षात घेता प्रत्येकाच्या तक्रारी यथायोग्य निराकरण करण्याबरोबर तालुक्यातील शेवटच्या घटकांपर्यत पोहचून त्यांच्या समस्या सोडवण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे सांगीतले आहे.