दापोली तालुक्यातील समुद्रकिनार्‍यावर ऑईलचा तवंग   

जाहिरात-2

तो मृत ‘डॉल्फिन’ नाही तर ‘गादा’ मासा मृत

दापोली | रुपेश वाईकर :

दापोली तालुक्यातील दाभोळ ते केळशी या ५० कि.मी.च्या समुद्रकिनार्‍यावर मोठ्या प्रमाणात ऑईलचा तवंग आल्याने समुद्रकिनारा पूर्णपणे काळवंडला आहे. ऑइल किंवा डांबर सदृश्य गोळे किनाऱ्यावर आले आहेत,दरम्यान चार दिवसांपुर्वी गादा मासा मृत झाला होता ही बाब रविवारी वनविभागाच्या लक्षात आले तात्काळ त्यांनी घटनास्थळी भेट देऊन योग्य ती विल्हेवाट लावली. त्यामुळे समुद्रकिनारी अंडी घालण्यासाठी येणार्‍या कासवांना धोका निर्माण झाला आहे. तसेच गणेशमूर्तीचे विसर्जन करायला किनार्‍यावर कसे जायचे असा प्रश्‍न भाविकांना पडला आहे.

[दरम्यान दापोलीतील हर्णै-पाजपंढरीकडे जाणार्‍या रस्त्यालगतच समुद्रकिनारी मृत कुजलेल्या अवस्थेत गादा मासा सापडला.हा गादा मासा वनविभागाच्या अधिकार्‍यांनी पंचनामा करून तिथेच पुरून योग्य प्रकारे विल्हेवाट लावली.गेल्या वर्षीसुद्धा पावसाळ्यापूर्वी तालुक्याच्या याच किनारपट्टीला तीन गादा मासे मृतावस्थेत सापडले होते. आता यावर्षीही डॉल्फिन मासा मृत होवून समुद्रकिनारी सापडण्यास सुरूवात झाली आहे. गेल्या वर्षी दोन महिन्यात तीन गादा मृतावस्थेत सापडले. आता सापडलेल्या या गादा माशाच्या तोंडावर दोरखंड गुंडाळलेला होता. तसेच दोन दिवसांपूर्वीच किनार्‍याला लागला असल्याचे वनविभागाने सांगितले.अनेकजण या माशाला डॉल्फिन सदृश्य दिसत असल्याने डॉल्फिन समजतात,पण हा मृत मासा गादा प्रजातिलमधील होता अशी माहिती वनपाल श्री.सावंत यांनी दिली.