सावंतवाडी खासकीलवाडा येथे दुकान फोडून धाडसी चोरी

जाहिरात-2

४० हजारांची रोकड लंपास : अज्ञाताविरोधात गुन्हा दाखल

सावंतवाडी । प्रतिनिधी :

सावंतवाडी शहरातील खासकीलवाडा भागात असलेले सुनील होडावडेकर यांचे टपरीवजा दुकान फोडून अज्ञात चोरट्याने ४० हजाराची रोकड लंपास केली. बुधवारी सकाळी हा प्रकार उघडकीस आला. याबाबतची माहीती मिळताच पोलिसांनी त्या ठीकाणी धाव घेतली. दरम्यान, या चोरीत माहीतगाराचाच हात असल्याचा संशय व्यक्त होत असून टपरी मालक होडावडेकर यांनी दिलेल्या तक्रारीनुसार अज्ञात चोरट्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सावंतवाडी उप जिल्हारुग्णालयाच्या मागच्या गेटला लागून होडावडेकर यांची टपरी आहे. त्या ठीकाणी ते व्यवसाय करतात. बुधवारी सकाळी ते दुकान उघडण्यासाठी आले असता त्यांच्या दुकानाचा दरवाजा उचकटलेल्या अवस्थेत दिसला. यावेळी त्यांनी आपल्या सहकार्‍यांच्या मदतीने पोलिसांना खबर दिली. दरम्यान, बाजूला सीसीटिव्ही असल्यामुळे पोलिसांना संबधित चोरट्याचा शोध घेणे सोईचे ठरणार आहे. त्यानुसार आमचा तपास सुरू आहे, अशी माहीती पोलिस हवालदार बाबू तेली यांनी दिली आहे.