आचरा येथे गौरी गणपतीचे उत्साहात विसर्जन

जाहिरात-2

 

आचरा | अर्जुन बापर्डेकर

आचरा भागातील गौरी गणपतीचे विसर्जन उत्साहात करण्यात आले.
आचरा येथे समुद्र किनारी, पारवाडी खाडी चिंदर येथील विसर्जन ठिकाणी सुरक्षेच्या उपाययोजना पाळत ग्रामस्थांनी गणपती विसर्जन केले. आचरा देवूळवाडी येथेही गौरीचे विसर्जन पारंपरिक पद्धतीने केले गेले.

विसर्जन ठिकाणी आचरा पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक कैलास पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सुरक्षा व्यवस्था ठेवण्यात आली होती. पिरावाडी समुद्र किनारी सागर रक्षक, जीवरक्षकांच्या मदतीने गणपती विसर्जन करण्यात येत होते.