पानवल येथे बेकायदेशीर दारूवर कारवाई

जाहिरात-2

रत्नागिरी | प्रतिनिधी
तालुक्यातील पानवल येथे बेकायदेशीरपणे गावठी हातभट्टीची 625 रुपयांची 12 लिटर दारू विक्रीसाठी बाळगल्याप्रकरणी एकविरोधात ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई सोमवार 13 सप्टेंबर रोजी सायंकाळी 6 वा. करण्यात आली.

मनोहर शंकर कांबळे (45,रा.पानवल गौतमनगर, रत्नागिरी ) असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या संशयिताचे नाव आहे. याप्रकरणी अधिक तपास पोलीस हेड कॉन्स्टेबल वाजे करत आहेत.