40 वर्षीय व्यक्तीची गळफास लावून आत्महत्या

जाहिरात-2

लांजा तालुक्यातील कुरचुंब सुवारेवाडी येथील घटना

दारूच्या नशेत आत्महत्या केल्याचा पोलिसांचा अंदाज

लांजा | प्रतिनिधी :

अंगावरील शर्टाने गळफास लावून ४० वर्षीय व्यक्तीने आत्महत्या केल्याची घटना लांजा तालुक्यातील कुरचूंब सुवारेवाडी येथे घडली आहे. याप्रकरणी सोमवारी १३ सप्टेंबर रोजी रात्री उशिरा लांजा पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

याबाबत लांजा पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार तालुक्यातील कुरचुंब सुवारेवाडी येथील धनंजय ताम्हणकर याला दारूचे व्यसन होते रविवारी १२ सप्टेंबर रोजी सकाळी दहा वाजता तो दाभोळ येथे चिकन आणण्यासाठी गेला होता. दुपारी तो दारू पिऊन घरी आला होता. जेवण झाल्यानंतर तो सायंकाळी पाच वाजेपर्यंत घरात घरात होता. त्यानंतर सायंकाळी पाच नंतर तो घराबाहेर पडला होता मात्र काळपर्यंत घरी न आल्याने त्याचे वडील वासुदेव ताम्हणकर तसेच भाऊ मुकेश ताम्हणकर यांनी सर्वत्र शोधाशोध केली मात्र तो आढळून आला नव्हता .सोमवारी १३ सप्टेंबर रोजी सकाळी वाडीतील सुनील सुवारे हा आपल्या बकऱ्या चारण्यासाठी कुरचूंब गावालगतच्या म्हाराडी येथे गेला होता. या ठिकाणीच त्याला धनंजयने आपल्या शर्टच्या साहाय्याने खैराच्या झाडाला गळफास लावून आत्महत्या केल्याचे दिसून आले. सुनील सुवारे याने याबाबतची माहिती धनंजय त्याच्या घरच्यांना दिली .त्यानंतर धनंजय चे वडील व भाऊ घटनास्थळी दाखल झाली .त्यावेळी धनंजयचा झाडाला लटकलेल्या अवस्थेत दिसून आला.

याबाबतची माहिती वासुदेव ताम्हणकर यांनी लांजा पोलीस ठाण्यात दिली. या घटनेची माहिती मिळताच लांजा पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक दादासाहेब घुटुकडे तसेच हेडकॉन्स्टेबल शांताराम पंदेरे , अमोल दळवी, चालक चेतन घडशी आदी घटनास्थळी दाखल झाले. घटनेचा याठिकाणी पंचनामा करण्यात आला. आत्महत्या केलेल्या धनंजय हा अविवाहित असून तो आपले आई-वडील आणि भावा सोबत राहत होता.

दरम्यान धनंजयने दारूच्या नशेत आत्महत्या केल्याचा अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे. या प्रकरणी लांजा पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.