“कांचन डिजिटल”तर्फे आयोजित “गणपती सजावट स्पर्धा” निकाल जाहीर!

जाहिरात-2

मिरजोळे येथील दीपक मेस्त्री व परिवारचा देखावा प्रथम

मांडवी पर्यटन संस्थेचे अध्यक्ष राजीव कीर, उद्योजक प्रसन्न आंबूलकर आणि सुरेश गुंदेचा (अरिहंत ग्रुप) यांचे बहुमोल सहकार्य

रत्नागिरी : रत्नागिरीतील प्रसिद्ध फोटो स्टुडिओ “कांचन डिजिटल”तर्फे प्रतिवर्षीप्रमाणे यंदाही “कांचन डिजिटल गणपती सजावट स्पर्धा 2021” ऑनलाईन आयोजित करण्यात आली. ही स्पर्धा मांडवी पर्यटन संस्थेचे अध्यक्ष राजीव कीर, उद्योजक प्रसन्न आंबूलकर आणि सुरेश गुंदेचा (अरिहंत ग्रुप) यांच्या बहुमोल समन्वयाने यशस्वीपणे पार पडली. या स्पर्धेत मिरजोळे येथील दीपक मेस्त्री आणि परिवाराने तयार केलेल्या जनाबाई देखाव्याला प्रथम क्रमांक प्राप्त झाला आहे.

ऑनलाईन असूनही यंदाही या स्पर्धेला तालुकाभरातून उदंड प्रतिसाद लाभला. रत्नागिरी तालुक्याबाहेरील चिपळूण, लांजा येथील स्पर्धकांनी या स्पर्धेत सहभाग नोंदविला, हे विशेष उल्लेखनीय आहे. स्पर्धेत एकूण 68 स्पर्धकांचे व्हिडिओ प्राप्त झाले. त्यांचे अत्यंत काटेकोर परीक्षण करण्यात आले. प्रसिद्ध गायक, गीतकार, संगीतकार तसेच मूर्तिकलाकार अभिजीत नांदगावकर आणि कांचन डिजिटल टीम यांनी या स्पर्धेचे परीक्षण केले.

स्पर्धेचा सविस्तर निकाल पुढीलप्रमाणे :-
■ प्रथम – दीपक मेस्त्री आणि परिवार ( मिरजोळे, देखावा- जनाबाई),
□ द्वितीय- जीवन कोळवणकर (कुवारबाव, देखावा- सौरऊर्जा महत्व),
□ तृतीय- अजय पारकर (मावळंगे, देखावा- सुंभ सजावट)
■ विशेष उल्लेखनीय :-
1) संजय वर्तक, कुवारबाव
2) प्रशांत पारकर, जुवे
■ उत्तेजनार्थ:-
1) आशिष तरळ, कसोप
2) ओंकार कांबळे, नवीन दत्तमंदिर-मिऱ्या
3) रजनीश वासावे, गावडे आंबेरे
4) जयदीप सावंत, सडामिऱ्या
5) अनिल गोताड, कोतवडे

■ पारितोषिक स्वरूप -:
□ प्रथम क्रमांक- 5000/- रुपये, सन्मानचिन्ह व प्रमाणपत्र
□ द्वितीय- 3000/- रुपये, सन्मानचिन्ह व प्रमाणपत्र
□ तृतीय- 2000/- रुपये, सन्मानचिन्ह व प्रमाणपत्र
■ विशेष उल्लेखनीय :-
प्रत्येकी 1000/- रुपये, सन्मानचिन्ह व प्रमाणपत्र
■ उत्तेजनार्थ:-
प्रत्येकी 500/- रुपये व प्रमाणपत्र

“कांचन डिजिटल गणपती सजावट स्पर्धा 2021” ह्या स्पर्धेचा पारितोषिक वितरण सोहळा अनंत चतुर्थी नंतर दिमाखात संपन्न होईल. हा सोहळा कोरोनाची सर्व शासकीय नियमावली रीतसर पाळून आयोजित केला जाईल. तसेच “कांचन डिजिटल-कांचन मालगुंडकर” या युट्यूब चॅनलवर हा सोहळा लाईव्ह दिसणार आहे. विजेत्यांनी मोजक्या संख्येत प्रत्यक्ष पारितोषिक स्वीकारण्यास येणे क्रमप्राप्त आहे. यंदाची स्पर्धा यशस्वीपणे पार पडली, त्याप्रमाणे पुढील वर्षीही ही स्पर्धा याहून भव्य स्वरूपात घेण्यात येईल. याचबरोबर वर्षभरात इतरही अनेक सांस्कृतिक, सामाजिक कार्यक्रम आयोजित करण्यात येतील, अशी माहिती आयोजक कांचन डिजिटलचे प्रसिद्ध फोटोग्राफर कांचन मालगुंडकर यांनी यानिमित्ताने दिली.