झाराप येथील इलेक्ट्रॉनिक दुकानात चोरी करणारा चोरटा पोलिसांच्या हाती

जाहिरात-2

 

कुडाळ  | प्रतिनिधी

मुंबई-गोवा महामार्गावरील झाराप तिठा येथील प्रकाश इलेक्ट्रॉनिक्स अँड इलेक्ट्रिकल दुकानांमध्ये सुमारे १५ हजार रुपयांची चोरी करणारा पोलिसांना सापडला असून त्याचे नाव मेघश्याम प्रभाकर सावंत (वय २० रा. पिंगुळी वडगणेश, मूळ रा. पोखरण) असे असून त्याला उद्या मंगळवार १४ सप्टेंबर रोजी न्यायालयात दाखल केले जाणार आहे.

मुंबई-गोवा महामार्गावरील येथे असलेल्या प्रकाश इलेक्ट्रॉनिक्स अँड इलेक्ट्रिकल्स दुकानांमध्ये १२ जुलै रोजी दुकानात प्रवेश करून या दुकानातील सुमारे १५ हजार रुपयांची चोरी केली होती ही चोरी १३ जुलै रोजी उघड झाली दरम्यान याबाबत दुकानाचे मालक मनोहर पवार यांनी कुडाळ पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती तसेच दुकानांमध्ये चोरी करताना सीसीटीव्हीचे चित्रीकरण पोलिसांना दिले होते दरम्यान ओरोस येथील एका चोरी प्रकरणात तपासासाठी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने मेघश्याम सावंत याला ताब्यात घेतले होते त्यावेळी त्यांनी झाराप तिठा येथे प्रकाश इलेक्ट्रॉनिक्स अँड इलेक्ट्रिक दुकानांमध्ये चोरी केल्याचे सांगितले या चोरट्याला कुडाळ पोलिसांनी ताब्यात घेतले असून उद्या (मंगळवार १४ सप्टेंबर) रोजी न्यायालयात हजर केले जाणार आहे असे तपासी अंमलदार भांगरे यांनी सांगितले.