आरोग्य मंदिर येथे दुचाकीवर विसरलेल्या हॅन्डबॅगमधून अज्ञाताने १ लाख १२ हजारांचे मंगळसूत्र लांबवले

जाहिरात-2

रत्नागिरी । प्रतिनिधी
बिल्डिंगच्या पार्किंग मधील दुचाकीवरील हॅन्ड बॅग लांबवून अज्ञाताने 1 लाख 12 हजार रुपयांचा ऐवज चोरला.ही घटना रविवार 12 सप्टेंबर रोजी दुपारी 3.30 ते 4.30 वा. कालावधीत आरोग्य मंदिर येथे घडली.

याबाबत प्रियांका सुनीत हडकर (27, रा. शंखेश्वर नगर फेज 2जी, आरोग्य मंदिर, रत्नागिरी ) यांनी शहर पोलिसांकडे तक्रार दिली आहे. त्यानुसार, रविवारी त्या आपली हॅन्ड बॅग बिल्डिंगच्या पार्किंग मधील आपल्या दुचाकीवर विसरून गेल्या होत्या.ही संधी साधत अज्ञाताने त्यांची बॅग पळवली. बॅगमध्ये त्यांचे 1 लाख 12 हजार रुपयांचे मंगळसूत्र होते. अधिक तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक मनोज भोसले करत आहेत.