गणेशोत्सवाच्या काळात तालुक्यात विजेचा खेळखंडोबा शहरासह ग्रामिण भागाला फटका

मंडणगड | प्रतिनिधी

गणेशोत्सवाच्या दोन दिवस आधीपासून तालुक्यात विजेचा खंळखंडोबा सुरु झालेला असून कोणतीही सुचना न देता अचानक वीज पुरवठा खंडित होत असल्यामुळे तालुकावासीय पुरते हैराण झाले आहेत.

सप्टेंबर महिन्याच्या दुसर्या आठवण्यात कोकणात अतिवृष्टीत इशारा हवामान खात्याने दिला होता त्यामुळे त्यानसार उत्तर रत्नागिरीतील काही तालुक्यात अतिवृष्टीही झाला या काळात खंडीत झालेला तालुक्यातील विज पुरवठा अद्याप सुरळीत होण्याचे नाव घेत नसल्याचे दिसून आले आहे. गणेशोत्सवासारख्या महत्वाच्या सणात विजेची अनुपस्थिती नाराजीचे कारण ठरत असुन जनजीवन प्रभावीत होण्याने झाला आहे. गणेशाचे तालुक्यात आगमान शहरासह तालुक्यातील बहुतांश गावात अंधारातच झाले विजे अभावी मंडणगड शहरातील अनेक भागात गणेश उत्सव असतानाही पाणी टंचाईस सामोरे जावे लागले. महावितरण कंपनीकडून गेल्या चार दिवसात दस्तरीतून लाईट बंद केल्याचे कारण सांगतीले जाते व कोणतेही पुर्व सुचना नसताना अनिश्चीत काळासाठी विज गायब होत असल्याने यंदाचे तालुक्याचे गणेशोत्सव पावर कटचे संकटाचा सामना करतच पुढे सरकत आहे.