भिंगळोली येथील धोकादायक झाड पाडताना दुचाकीस्वार झाला जखमी

मंडणगड | प्रतिनिधी

आंबडवे लोणंद राष्ट्रीय महामार्गावर भिंगळोली ग्रामपंचायत गेल्या दोन महिन्यापासून धोकादायक स्थितीत असलेले आकेशीयाचे झाडे गलथान कारभाराची पंरपरा लाभलेल्या राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने 9 सप्टेंबर 2021 रोजी गणेशोत्सवाच्या पुर्वसंध्येला तोडले.

झाड पडत असताना रस्त्यावरुन दुचाकीने प्रवास करणारा नाशीक येथील एक तरुण गंभीर जखमी झाला त्याच्या दुचाकीचेही मोठे नुकसान झाले. कधीही पडेल असे धोकादायक स्थितीतील झाडे तोडण्यासाठी येथील ग्रामस्थ राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण, आपत्ती व्यवस्थापन कक्ष व वनविभागाकडे आग्रही होते. मात्र सर्वच खात्यांनी आपली जबाबदारी दुस-यावर टाकल्याने झाड धोकादयक बनुनही हटवण्यात आले नव्हते. या संदर्भात तहसिलदार मंडणगड यांना जातीने लक्ष घालावे लागले झाडामुळे निर्माण होणा-या अपघाताची शक्यता लक्षात घेत जनतेच्या तीव्र भावना लक्षात घेऊन गणेशोत्सवाच्या पुर्व संध्येला तालुक्यात दाखल होणा-या चाकरमन्यांची प्रवासाची धामधुम सुरु असताना अगदी रात्र पडत असताना लाकूड तोडण्यासाठी कटर घेवून प्राधिकरणाचे अधिकारी व माणुस दाखल झाला. त्याने कटरच्या मदतीने नाममात्र धक्का देण्याचा प्रयत्न केला असता झाड खाली पडू लागले.

नेमकी याचवेळी या रस्त्यावरुन मुंबईकडे जाणारा नाशीक येथील पर्यटनासाठी दापोली येथे आलेला युवक गर्दी वाट काढून पुढे जाण्यासाठी मार्गक्रमण करत असताना झाडा खाली सापडला. यात त्याच्या दुचाकीचे नुकसान तर झालेच त्याच्या शारिरासह गंभीर दुःखापत झाली त्यांच्यावर दापोली येथे उपचार सुरु आहेत. आपत्ती व्यवस्थापन कशा प्रकारे करु नये याचा उत्तम वस्तुपाठ येथील सर्व यंत्रणांनी या निमीत्ताने घालून दिला आहे. सातत्याने केली जाणारी मागणीनंतर रात्रीच्या सुमारास निरुपयाने झाड तोडीच्या कारवाई करणार्या यंत्रणांच्या या कृतीविषयी नाराजी व्यक्त होत आहे.