गणेशोत्सवाकरिता तालुक्यात 7306 गणेशभक्त दाखल

मंडणगड | प्रतिनिधी

गणेशोत्सवासाठी तालुक्यातल 7306 गणेशभक्त दाखल झाले असल्याची माहीती तहसिल कार्यालयातून प्राप्त झाली आहे. गणेशोत्सवानंतर येऊ घेतलेल्या कोरोना विषाणू संसर्गाचे तिस-या लाटेचा सामना करण्यासाठी कोव्हीड समितीने वाडी व ग्राम कृती दलाचे माध्यमातून तालुक्यात गणेषोत्सवासाठी आलेल्यांची आकडेवारी गोळा केली आहे.

5 सप्टेंबर 2021 ते 13 सप्टेंबर 2021 या कालावधीत आरोग्य विभाग व पोलीस तपास नाक्याची अनुपस्थिती खटकणारी असताना नंगरपंचायत व ग्रामपंचायतीही या बाबतीत फारश्या आग्रही नसल्याचे दिसून आल्याने सर्वाच्याच चिंता वाढलेल्या आहेत. या कालवधीत तालुक्यातील गावागावात 7306 चाकरमनी नव्याने दाखल झाले आहेत यातील 3847 जणांनी कोरोना दोन्ही डोसचे लसीकरण करुन घेतले आहे. उत्सवासाठी आलेल्या नागरीपैकी 2753 जाणांची कोरोना तपासणी बाकी आहे यापैकी 778 जणांची कोरोना चाचणी (अॅन्टीजन) चाचणी करण्यात आली असून त्यापैकी एकहीजण कोरोना बाधीत आठळून आलेला नाही.
असे असले तरी तालुक्यातील खासगी रूग्णालयात बाहय रूग्ण तपासणी नेहमी पेक्षा अधिक असल्याचे दिसून येत आहे.

तालुक्याचे आरोग्य रामभरोसे

तिस-या लाटेची शक्यता लक्षात घेता आरोग्य विभागातील कर्मचारी वैद्यकीय अधिकारी व सोई सुविधांचा वानवा लक्षात घेता तालुक्याचे आरोग्य राम भरौसे असल्याची भावना तालुकावासीयांमध्ये निर्माण झाली आहे. ऑगस्ट महिन्यात येथील तालुका वैद्यकीय अधिकारी निवृत्त झाले याच बरोबर ग्रामिण रुग्णालयाचे अधिक्षकांची बदली झाली गेल्या तीन महिन्यापांसून तालुक्यातील एकमेव कोव्हीड हॉस्पीटलचा कारभार ते सांभाळत होते सध्या तालुका वैद्यकीय अधिकारी नियुक्त झाले असले तरी कोव्हीड व ग्रामिण रुग्णालयासाठी तज्ञ वैद्यकीय अधिकाÚयांची प्रतिक्षा आहे आर.टी.पी.आर. चाचण्या विलंबाने येण्याची समस्या अद्याप सुरुच आहे.