अणुस्कुरा घाट रस्ता धोकादायक

अतिवृष्टीमुळे पाचल-अणुस्कुरा मार्गावर अणुस्कुरा घाटात दरड कोसळली
जाहिरात-2

राजापूर | वार्ताहर

जुलेैच्या शेवटच्या आठवडयात झालेल्या अतिवृष्टीत पाचलल-अणुस्कुरा मार्गावर अणुस्कुरा घाटात दरड कोसळून मार्ग ठप्प झाला होता. रविवारी मध्यरात्री पुन्हा अणुस्कुरा घाटात दरड कोसळल्याने घाटमार्गे कोल्हापुरला जाणारी वाहतुक बंद पडली होती. दरम्यान सार्वजनिक बांधकाम विभागाने तात्काळ दरड हटविली आणि सकाळ पासुन अणुस्कुरा मार्गे वाहतुक सुरु झाली.

कोकण व कोल्हापूरला जोडणाऱ्या घाटांपैकी केवळ अणुस्कुरा घाटमार्गेच सर्व प्रकारची वाहतुक सुरु आहे. सध्या या घाटमार्गे रत्नागिरी, लांजा ,देवरुख यासह राजापूर आगाराच्या एसटी सेवेसह, मालवाहतुक पेट्रोल, डिझेलसह गॅसचे टँकर ,घरगुती सिंलेंडरची वाहतुक, जळावु लाकडाची वाहतुक, खाजगी वाहने याच घाटमार्गे ये – जा करीत आहेत.
त्यामुळे अणुस्कुरा मार्गे वाहतुक वाढली असतानाच रविवारी मध्यरात्री दोन वाजण्याच्या सुमारास अणुस्कुरा घाटात दरड कोसळली आणि वाहतुक बंद पडली होती. दरम्यान सार्वजनिक बांधकाम विभागासह प्रशासनाने तात्काळ यंत्रणा लावुन घाटात कोसळलेली दरड हटवुन घाटातील वाहतुक सुरळीत सुरु केली. सकाळी राजापूर आगारातुन सुटलेली पुणे बस घाटातुन पुढे मार्गस्थ झाली. त्यानंतर घाट मार्गे सुरळीत वाहतुक सुरु झाली होती.

सोमवारी काही वाहने घाटमार्गे ये – जा करताना दिसली दरम्यान घाटातील रस्ता खराब झाला असुन काही ठिकाणी खड्डे पडल्याने सावधानता बाळगुन वाहने चालवावी लागत आहेत. अणुस्कुरा घाटात अधुन मधुन दरडी कोसळण्याचे प्रकार घडत असल्याने वाहन चालकांना जीव मुठीत धरून प्रवास करावा लागत आहे.