बायोस्टॅड इंडिया लि. कपंनीच्या वतीने आडिवरे हायस्कुलमधील दहा विद्यार्थ्यांना आस्था स्कॉरलशीपचे वितरण

जाहिरात-2

राजापूर | वार्ताहर

बायोस्टॅड इंडिया लि. या कपंनीच्या वतीने तालुक्यातील आडिवरे नवेदर येथील श्री महाकाली इंग्लिश स्कुल या प्रशालेतील १० गरजु, हुशार व होतकरू मुलांना बायोस्टॅड आस्था स्कॉरलशीप देण्यात आली.

बायोस्टॅड इंडिया लि. ही कंपनी कृषी उत्पादन क्षेत्रात कार्यरत आहे. कंपनीच्या वतीने सामाजिक बांधिलकी म्हणून विविध उपक्रम राबविले जातात. त्यामध्ये गरीब, गरजू मुलांना शिक्षणासाठी प्रोत्साहीत करण्याच्या उद्देशाने आस्था स्कॉलरशीप दिली जाते. दरवर्षी या उपक्रमांतर्गत ३० लाख रूपये खर्च केले जातात. यावर्षी आडिवरे प्रशालेतील १० मुलांना प्रत्येकी दोन हजार पाचशे प्रमाणे स्कॉरलशीपच्या माध्यमातून मदत करण्यात आली.

नुकत्याच पार पडलेल्या छोटेखानी समारंभात विद्यार्थ्यांना या स्कॉलरशीपचे धनादेश प्रदान करण्यात आले. याप्रसंगी बायोस्टॅड इंडिया लि. चे उपाध्यक्ष व आडिवरे प्रशालेचे माजी विद्यार्थी गोकुळ डाफळे, प्रशालेचे माजी मुख्याध्यापक श्री. शेवडे, महाकाली प्रतिष्ठानचे अध्यक्ष भाऊ शेटये, राजापूरचे माजी नगराध्यक्ष हनिफ काझी, राजापूर अर्बन बँकेचे वरिष्ठ अधिकारी शैलेंद्र संसारे, कंपनीचे एसबीयु वेस्ट वनचे झोनल मॅनेजर संदीप शिंदे, रत्नागिरी जिल्हा टेरिटरी मॅनेजर शशांक संसारे, बायोस्टॅडचे वितरक ऋषीकेश शेटये, बंसी आठल्ये, प्रशालेचे शिक्षक प्रज्ञेश देवस्थळी, श्री. जाधव उपस्थित होते.

यावेळी प्रशालेतील प्रियांका रोकडे, रिध्दी नागले, चित्रा लिंगायत, मानसी शिर्सेकर, राज कुंभार, श्रावणी लिंगायत, सानिका आफणकर, रूपाली टुंबरे, अंतरा नार्वेकर, सानिया वारिक या हुशार होतकरू मुलांना शिष्यवृत्तीचे धनादेश प्रदान करण्यात आले.

कृषी क्षेत्राशी निगडीत असलेल्या कंपनीने गरीब होतकरू मुलांचे पैशाअभावी शिक्षण थांबू नये म्हणून हाती घेतलेल्या या उपक्रमाचे उपस्थित मान्यवरांनी कौतुक केले.