सिंधुदुर्ग जिल्ह्यात प्रथमच झाली नीट परीक्षा,८७१ विध्यार्थ्यांनी दिली “नीट”

जाहिरात-2

ना.नारायण राणे केंद्रात उद्योग मंत्री होताच रत्नागिरी,सिंधुदुर्ग जिल्ह्याला मंजूर केले होते नीट चे परीक्षा केंद्र

सिंधुदुर्ग जिल्ह्यात कणकवली आणि कुडाळ येथे झाली परीक्षा

या परीक्षेसाठी गोवा,पुणे,मुंबईत जावे लागत होते,जिल्हात केंद्र झाल्याने पालकांनी व्यक्त केले समाधान

संतोष राऊळ | कणकवली
बारावी नंतरच्या वैद्यकीय शैक्षणिक प्रवेशासाठी महत्वाची असलेली “नीट” परीक्षा आज सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कणकवली आणि कुडाळ या दोन केंद्रांवर झाली. कणकवली विद्यामंदिर हास्कुलच्या केंद्रावर ३२७ पैकी ३०३ विध्यार्थ्यांनी परीक्षा दिली.२४ विध्यार्थी गैरहजर होते.तर कुडाळ हास्कुल केंद्रावर ६०० पैकी ५७८ विध्यार्थ्यांनी परीक्षा दिली,३२ जण गैरहजर होते.एकूण ९२७ पैकी ८७१ विध्यार्थ्यांनी नीट परीक्षा दिली.सिंधुदुर्ग जिल्ह्यात नीट परीक्षा केंद्राची मागणी गेली अनेक वर्षे सुरू होती मात्र दिल्लीत नारायण राणे हे केंद्रीय उद्योग मंत्री होताच केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्याशी चर्चा करून हे नीट परीक्षा केंद्र तातडीने मंजूर केले त्यामुळे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील विध्यार्थाना जिल्हातच परीक्षा देता आली.
कणकवली आणि कुडाळ या दोन्ही केंद्रांवर सुरळीत परीक्षा झाली. पोलीस बंदोबस्तात ही परीक्षा झाली.परीक्षा केंद्रावर कोणताही अनुचित प्रकार घडला नाही.कुडाळ हास्कुल केंद्रात केंद्र संचालक ए. के. जामसंडेकर याच्या सह एम.डी. हवळ, सचिन मेस्त्री,नंदकुमार नाईक ,लक्षुमन पावसकर यांच्या पथकाने काम पाहिले तर कणकवली हास्कुल च्या केंद्रावर केंद्रसंचालक बी.डी.सरवदे,पी.जे.कांबळे,विशाल सावंत,अ. व्ही.वणवे,लक्षुमन पावसकर यांच्या पथकाने काम पाहिले.निट ची पहिलीच परीक्षा असतांना कोणताही गोधळ न होता सुरळीत परीक्षा संपन्न झाली.
सिंधुदुर्ग जिल्ह्यात हे नीट परीक्षा केंद्र नव्हते,त्यावेळी मुंबई, पुणे किंवा गोवा या ठिकाणी परीक्षेला जावे लागत होते.अशा वेळी विध्यार्थी, पालक यांची फारच दमछाक होत होती.नीट परीक्षा केंद्राची मागणी सातत्याने केली जात होती मात्र नारायण राणे केंद्रात उद्योगमंत्री होताच आठ दिवसात हे नीट परीक्षा केंद्र शिक्षण मंत्र्यांना सांगून मंजूर केले आहे. त्यामुळे यापुढे नीट परीक्षेसाठी जिल्ह्यातील मुलांना बाहेरच्या शहरात जावे लागणार नाही.दरवर्षीची परीक्षा सिंधुदुर्ग जिल्हातच होणार आहे.