नवयुग उत्कर्ष युवक मंडळाचा गणेशोत्सव यावर्षी अवघ्या दीड दिवसांचा

भांबेड येथे जपलीय चाळीस वर्षांची परंपरा 
कोरोना मुळे सर्व कार्यक्रम रद्द 

लांजा । प्रतिनिधी

गेल्या चाळीस वर्षांची परंपरा असलेल्या आणि यावर्षी 41 व्या वर्षात पदार्पण केलेल्या लांजा तालुक्यातील भांबेड येथील नवयुग उत्कर्ष युवक मंडळाचा गणेशोत्सव अवघ्या दीड दिवसात ठेवण्यात आला होता. शनिवारी 11 सप्टेंबर रोजी या सार्वजनिक गणेशाला भावपूर्ण वातावरणात निरोप देण्यात आला.

लांजा तालुक्यातील भांबेड येथील नवयुग उत्कर्ष युवक मंडळाचा सार्वजनिक गणेशोत्सव हा संपूर्ण तालुक्यात प्रसिद्ध आहे या गणेशोत्सवाच्या काळात करण्यात येणारे देखावे हे सामाजिक, धार्मिक संदेश देणारे असतात त्यामुळे हा सार्वजनिक गणेशोत्सव संपूर्ण तालुक्यात प्रसिद्ध आहे. मात्र यावर्षी कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव आणि भांबेड परिसरात देखील असणारे कोरोना रग्णांची संख्या आणि त्यात मुंबईकर चाकरमानी यांची पडणारी भर लक्षात घेता मंडळाच्या वतीने महिनाभरापूर्वी पार पडलेल्या सभेत हा गणेशोत्सव अवघ्या दीड दिवस साजरा करण्याचा निर्णय घेण्यात आला होता.
यानुसार शुक्रवारी 10 सप्टेंबर रोजी या सार्वजनिक गणेशोत्सवाचे थाटामाटात आगमन झाले होते. त्यानंतर आज दीड दिवसांनी म्हणजे शनिवारी 11 सप्टेंबर रोजी भावपूर्ण वातावरणात या सार्वजनिक गणेशाला निरोप देण्यात आला यावेळी सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाचे सर्व पदाधिकारी आणि गणेशभक्त उपस्थित होते.