ऋषीपंचमी व्रताची माहिती आणि महती तसेच संकेत व संदेश

नितीन परब :

ऋषिपंचमी म्हटली कि आमची आजी गं भा ,अहिल्याबाई व इतर विधवा बायका उपवास करायच्या आदले दिवशी चारपाच बायका अळू व भाजी खरेदी करायाला जायच्या (या दिवशी एक विशिष्ट प्रकारची भाजी केली जाते.अळूची पाने, सुरण, वाल, लाल भोपळा, मटार, भेंडी, कोवळा माठ( भाजी) या भाज्या वापरून ही भाजी तयार केली जाते.) यांतली कोणतीही भाजी बैलाच्या श्रमाची नसते. आणि रात्री आमच्याच घरी ते सोलने नीट करणे जे काय काम असेल ते करणे दुसऱ्या दिवशी ते अळू त्यात इतर भाज्या मका खड्याचे काळ मीठ आंबट घालून शिजवणे समुद्रावरून आल्यावर दगड आणलेले पाटावर मांडून त्यांना पूजन व त्यांना नैवद्य दाखविणे व नंतर उपवास सोडणे व ब्लीडींग मधील ज्यांनी ऋषींच्या अळू ला पैसे दिले होते ते सर्व अळू घेऊन जायचे हीच काय ती ऋषिपंचमीची ओळख
.
नंतर मी यावर अभ्यास केला
माझा पहिला समाज होता कि ऋषिपंचमी हि विधवा बायकांनच व्रत असते.
.
🌺🙏🌅 ऋषीपंचमीचे आशय आणि महत्व

कश्यप, भारद्वाज, विश्वामित्र, गौतम, जमदग्नी, वसिष्ठ आणि अत्रि या सात ऋषींची प्रत्येकी एक आणि वसिष्ठांची पत्नी अरुंधतीची एक अशा एकूण ८ सुपाऱ्या मांडून ही पूजा सिद्ध केली जाते. ब्रह्मदेवाचे मानसपुत्र पुलस्त्य, क्रतु,पुलस्त्य, मरीचि, अत्रि आणि वसिष्ठ या ऋषींचे पूजनही या दिवशी केले जाते. या दिवशी बैलाच्या कष्टाचे कोणतेही अन्न खाल्ले जात नाही. वर्षातून किमान एक दिवस तरी स्वतःच्याच कष्टाचे अन्न खावे, हा यामागचा संकेत वा संदेश आहे. अशा रितीने ‘स्वकष्टार्जित’ या शब्दाला ऋषींनी प्रतिष्ठा दिलेली आहे. आपल्या जीवनाच्या सर्वांगीण विकासासाठी ऋषींनी सांगितलेल्या ज्ञान सिद्धान्ताचे वाचन, चिंतन, मनन पुढच्या पिढीने करत राहावे, याची आठवण देण्यासाठी हे व्रत आहे असे मानले जाते. गृहस्थाश्रमी पुरुषांच्या बाबतीत या व्रताची मुख्य योजना मुख्यत: आचार प्रणालींची ओळख व्हावी व गृहस्थाश्रम हा त्यांच्याप्रमाणेच आचारसंपन्न व्हावा या हेतूने असतो. स्त्रियांनी रजोनिवृत्तीनंतर हे व्रत अशा प्रकारे केल्यास त्यांच्याकडून पूर्वी रजोदर्शन काळात घडलेल्या स्पर्शात्मक दोषांचे मानसिक पातळीवर निरसन होऊ शकते असे मानले जाते. ज्या विद्यार्थ्याना श्रावणी (वेदाध्ययन करणाऱ्या वर्गासाठी विहित व्रत)संस्काराचा लाभ होत नाही अशा सर्ववर्णीय स्त्री पुरुषांनी त्यांच्या नित्य कर्मातील त्रुटी व स्खलन यांच्या परिहारासाठी ऋषिपंचमी हे व्रत करावे, असे सांगितले आहे.

म्हणजे हे व्रत विधवा बायकांनीच करायचे हे साप खोट आहे ! मुली पुरुष देखील करू शकतात हे सिद्ध होते !

ज्या वयस्कर बायकांना समुद्रावर जाता येत नाही त्यांनी बादलीत जाडे मीठ टाकून ते खरे पाणी म्हणजे समुद्राचे पाणी समजून आंघोळ करणे साबण लावणे व्यर्ज .

🌺🙏🌅 व्रताचार

कोणत्याही व्रताचा काल व आचार निर्धारित होताना प्रामुख्याने भौगोलिक वातावरणाचा विचार केलेला असतो. त्यानुसार चातुर्मास काळात येणाऱ्या या ऋषी पंचमी व्रतामध्ये ऋषी पूजनाखेरीज आघाड्याच्या काष्ठाने दंतधावन, पंचगव्य प्राशन, सुवासिनींना हरिद्रास्नान, भस्मस्नान, गोमय स्नान, मृत्तिकास्नान, महासंकलपयुक्त तीर्थस्नान, अर्घ्यदान, अशा अनेक महत्त्वाच्या विधींचा अंतर्भाव केलेला आहे. ऋषिपंचमीच्या दिवशी विशिष्ट व्रताहार आणि ऋषी स्मरण (सप्तर्षीची पूजा ) या दोन्ही गोष्टी अत्यंत महत्त्वाच्या असून धर्मशास्त्रकारांना अभिप्रेत असणारा व्रताहार हा नेहमीच्या उपवासाहून पूर्णतया भिन्न आहे. कारण एरवीच्या उपासात रसाहार,फलाहार किंवा हविष्यान्न विहित असते.परंतु ऋषी पंचमीच्या दिवशी व्रताहारामध्ये केवळ मानवी कष्टातून उत्पन्न झालेले अर्थात, न नांगरलेल्या जमिनीमधील पदार्थाचे सेवन करणे अभिप्रेत असते. तसेच या व्रतातील विविध स्नाने सांप्रतकाली लोकप्रिय असणाऱ्या निसर्ग उपचार प्रणाली मध्ये आचरली जातात व त्यापासून होणारे लाभही दिसून येतात.

🌺🙏🌅 महिलांनी हे व्रत का करावे ?
.
रजस्वला दोष नाहीसा करण्यासाठी प्रायश्चित्त म्हणून हे व्रत केलं जातं.
भाद्रपद शुद्ध पंचमी ऋषिपंचमी हे व्रत करावे.

मासिक पाळी, अशौच आणि स्पर्शास्पर्श (मासिक पाळीत प्रणय न करणे तरी तो केला जातो) यांचा स्त्रियांवर होणारा परिणाम या व्रताने कमी होतो. हे या मागील शास्त्रीय आशय महतवाचा आहे !

🌺🙏🌅 हे व्रत महाराष्ट्रात ग्रामीण भागात विशेषत: कोकण भागात महिला करतात त्याचप्रमाणे नेपाळमधील महिलाही हे व्रत करतात.

🌺🙏🌅 एक मात्र खार आहे कि ऋषिपंचमीच्या अळूच्या भाजी ची चव पंचपक्वानांना देखील नाही हे खाल्ल्यावरच कळते.

🌺🙏🌅 मुंबई च्या समुद्र किनारी बायकांना कपडे बदलण्यासाठी काही आडोसा नसतो तेव्हा बिचाऱ्या महिलांना उघड्यावरच कपडे बदलावे लागतात तेव्हा काही आंबट शौकीन लोक मिटक्या मारत त्या महिलांकडे बघत असतात या बेशरम वृत्तीची चीड येते की तितकीच खंत हि वाटते ! …..ऋषिपंचमीच्या सर्व व्रतकर्त्या महिला यांना प्रहार परिवारातर्फे हार्दिक शुभेच्छा !