जामसंडे हायस्कूलसमोर मोटरसायकलची पादचा-याला जोरदार धडक ; बुधवारी रात्रीची घटना

जाहिरात-2

मोटरसायकलस्वार गंभीर जखमी ;पडवे येथे उपचार सुरू

देवगड : प्रतिनिधी
मोटरसायकलची जोरदार धडक बसून पादचारी मिलींद शिवराम जामसंडेकर(५०) रा.जामसंडे बौध्दवाडी हे गंभीर जखमी झाले आहेत तर मोटरसायकलस्वार रोहित वसंत काळे हा देखिल गंभीर जखमी झाला आहे.जामसंडेकर यांची प्रकृती qचताजनक असून त्यांना मुंबई येथे हलविण्यात आले आहे.हा अपघात बुधवारी रात्री १० वा.सुमारास जामसंडे हायस्कुलसमोर झाला.
याबाबत मिळालेल्या माहितीनूसार, जामसंडे येथील आपला बाजार या दुकानात कामाला असलेले जामसंडे बौध्दवाडी येथील मिलींद शिवराम जामसंडेकर(५०) हे रात्री १० वा.सुमारास दुकानातील काम आटोपून रस्त्याने चालत घरी जात होते.याचदरम्यान जामसंडे हायस्कुलसमोर देवगड पं.स शिक्षण विभागातील कनिष्ठ सहाय्यक रोहीत वसंत काळे(३०)यांच्या मोटरसायकलची त्यांना जोरदार धडक बसली.या अपघातात मिलींद जामसंडेकर व मोटरसायकलस्वार रोहीत काळे हे रस्त्यावर रस्त्यावर \ेकले गेले.
जामसंडेकर यांच्या डोकीला गंभीर दुखापत झाली तर रोहित काळे याच्या ओठ, हनुवटी, हाताला, नाकाला गंभीर दुखापत झाली.अपघात झाल्याचे समजताच जामसंडे बाजारपेठेतील नागरिक तसेच देवगड पोलिस स्टेशनचे अ‍ेएस्आय दशरथ चव्हाण, पोलिस नाईक प्रशांत जाधव, मिलींद परब, महेंद्र महाडिक, अमित हळणदकर यांनी जावून जखमींना उपचारासाठी ग्रामीण रूग्णालयात नेण्याची व्यवस्था केली.
या अपघातात जामसंडेकर यांची प्रकृती qचताजनक असल्याने गुरूवारी दुपारी मुंबई येथे उपचारासाठी नेण्यात आले आहे.तर रोहित काळे याच्यावर पडवे येथे उपचार सुरू आहेत.