चाफेरी येथील बर्म्याचा पर्‍या वळणावर एसटीची दुचाकीला धडक; चालकावर गुन्हा दाखल

जाहिरात-2

रत्नागिरी । रत्नागिरी

तालुक्यातील चाफेरी येथील बर्म्याचा पर्‍या येथील वळणावर बेदरकारपणे एसटी चालवून चालकाने समोरुन येणार्‍या दुचाकीला धडक देत अपघात केला. याप्रकरणी एसटी चालकाविरोधात जयगड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अपघाताची ही घटना बुधवार 8 सप्टेंबर रोजी सकाळी 8.30 वा.सुमारास घडली.

गणेश छगन मानवतकर (रा.रत्नागिरी) असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या एसटी चालकाचे नाव आहे.त्याच्याविरोधात वसंत तुकाराम महाकाळ (65,रा.कासारी भंडारवाडी,रत्नागिरी) यांनी तक्रार दिली आहे.त्यानूसार,बुधवारी सकाळी ते आपल्या ताब्यातील अ‍ॅक्सेस गाडी (एमएच-08-एव्ही-0121) वरुन पत्नीसोबत खंडाळा येथे जात होते.त्याच सुमारास गणेश मानवतकर आपल्या ताब्यातील एसटी (एमएच-14-बीटी-1837) घेउन समोरुन येत होता.ही दोन्ही वाहने बर्म्याचा पर्‍या येथील वळणावर आली असता मानवतकरचा एसटीवरील ताबा सूटला आणि त्याने महाकाळ यांच्या दुचाकीला धडक देत अपघात केला.यात महाकाळ यांच्या डोक्याला ,उजव्या पायाच्या पंज्याला तसेच गुडघ्याला मार लागून दुखापत होउन त्यांच्या दुचाकीचेही नुकसान झाले. याप्रकरणी अधिक तपास पोलिस नाईक मयेकर करत आहेत.