रत्नागिरी शहरात पोलिसांचे संचलन

रत्नागिरी । प्रतिनिधी 
अवघ्या दोन दिवसांवर येथून ठेपलेल्या गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर बुधवारी शहर पोलिसांनी संचालन केले.

गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर शासनाने कोरोनाचे अनेक निर्बंध घातले आहे. हा उत्सव शांततेत आणि कोरोनाचे नियम पाळत शांततेत साजरा व्हावा यासाठी जिल्हा पोलीस दलाच्या वतीने विविध बैठकांचे आयोजन करण्यात आले होते. याच पार्श्वभूमीवर बुधवारी रत्नागिरी शहर पोलिसांनी उपविभागीय पोलीस अधिकारी सदाशिव वाघमारे आणि शहर पोलीस निरीक्षक विनीत चौधरी यांच्या नेतृत्वाखाली रूट मार्च करण्यात आले. हे रूट मार्च शहरातील मारुती मंदिर ते आठवडा बाजार येथे करण्यात आले होते.