रत्नागिरीच्या पर्यटन विकासासाठी छायाचित्र स्पर्धा

इन्फिगो आय केअर हॉस्पिटल यांच्या सहकार्याने आणि रत्नागिरी पर्यटन सहकारी सेवा संस्था यांचे आयोजन

रत्नागिरी ।
सहकारी सेवा संस्था मर्यादित, रत्नागिरी तर्फे आयोजित भारतीय स्वातंत्र्याचे अमृतमहोत्सवी वर्ष व दिनांक २७ सप्टेंबर या जागतिक पर्यटन दिनाचे दुग्धशर्करा योगाचे औचित्य साधताना रत्नागिरी जिल्हयातील अस्सल कोकण परिचित होण्यासाठी एक विशेष छायाचित्र स्पर्धा आयोजित केली आहे. रत्नागिरी जिल्ह्यातील परिचित, अपरिचित आणि अप्रकाशित पर्यटन स्थळांचा शोध व्हावा आणि जास्तीत जास्त पर्यटकांपर्यंत ती स्थळे पोहोचवावी या उद्देशाने रत्नागिरी पर्यटन सहकारी सेवा संस्था मर्यादित तर्फे “निसर्ग छायाचित्र स्पर्धा” आयोजित केली आहे.

या स्पर्धेत निसर्ग पर्यटन, धार्मिक पर्यटन, वर्षा पर्यटन, कासपठार, निसर्गरम्य दृश्य, नद्या, तलाव, प्राणीजीवन, गिर्यारोहण, ट्रेकिंग त्याचबरोबर ऐतिहासिक स्थळे, लेणी, गड, किल्ले आणि स्थळांची छायाचित्रे सादर करता येतील. उत्कृष्ट ठरणाऱ्या पहिल्या तीन प्रवेशिकांना पारितोषिक देऊन गौरविण्यात येणार आहे. विजेत्या स्पर्धकांना केंद्र शासनाच्या पर्यटन मंत्रालयाकडून प्रमाणपत्र तसेच टी-शर्ट दिला जाणार आहे. जागतिक पर्यटन दिनानिमित्त ही स्पर्धा आयोजित केली असून १२ बाय १८ इंच ३०० डी.पी.आय सोल्युशन असलेल्या छायाचित्राची ई-मेल द्वारे व व्हॉटस्अॅप क्रमांकावर कॉपी दिनांक २५ सप्टेंबर २०२१ पर्यंत खालील व्यक्तीकडे द्यावयाची आहेत. छायाचित्रासोबत छायाचित्र टिपलेल्या स्थळांची थोडक्यात माहिती तसेच स्पर्धकांनी स्वत:चे नाव, पूर्ण पत्ता, ई-मेल अॅड्रेस आणि संपर्क क्रमांक द्यावयाचा आहे. या स्पर्धेत रत्नागिरी जिल्हयातील रहिवाशी असलेले स्पर्धक स्पर्धेत भाग घेऊ शकतात. यात व्यावसायिक फोटोग्राफरही भाग घेऊ शकतात व छायाचित्र मोबाईल आणि कॅमेरा या दोन माध्यमातून टिपलेली असावीत. छायाचित्रामध्ये कोणतीही छेडछाड करु नये. स्पर्धेसाठी प्रवेश शुल्क र.२००/एवढे आहे. पहिल्या तीन क्रमांकांना अनुक्रमे पाच हजार रुपये, तीन हजार रुपये, दोन हजार रुपये आणि उत्तेजनार्थ पहिल्या तीन क्रमांकांना एक-एक हजार रुपये अशी रोख पारितोषिके देण्यात येणार आहेत.

स्पर्धकांनी आपली छायाचित्रे प्रवेश शुल्कासह (गुगल-पे नं. मो. ९१३०३८३६६६ वर) रत्नागिरी येथील प्रसिद्ध छायाचित्रकार अजय बाष्टे- मो.९९७५५५१६५५ आणि विद्याधर साळवीमो.८३०८३३९५६२ या व्हॉटस्अॅप क्रमांकावर छायाचित्र पाठवावीत आणि संस्थेचा ई-मेल आयडी ratnagiriprytn270921@gmail.com यावर द्यावीत. तरी या स्पर्धेत जास्तीत जास्त स्पर्धकांनी भाग घ्यावा असे आवाहन संस्थेचे अध्यक्ष राजू भाटलेकर आणि मार्गदर्शक भाई रिसबुड यांनी केले आहे.