आम.नितेश राणे यांनी सोडलेल्या मोदी एक्स्प्रेस रेल्वेचे कणकवलीत जंगी स्वागत..!

*प्रवाशांनी मानले आम.नितेश राणे यांचे आभार

*मोफत प्रवासाच्या नवव्या वर्षी रेल्वेच सोडल्याने गणेश भक्त भारावले

*शुद्ध जेवण,पिण्याच्या पाण्याची व्यवस्था,जागेचे आरक्षण या सोयीमुळे प्रवास सुखकर झाल्याचे व्यक्त केले समाधान

संतोष राऊळ | कणकवली
आमदार नितेश राणे यांनी कोकणात येणाऱ्या गणेश भक्तांसाठी मोफत सोडलेल्या मोदी एक्स्प्रेस रेल्वेचे कणकवलीत जंगी स्वागत करण्यात आले.या रेल्वेतून प्रवास केलेल्या प्रवाशांचे गुलाबपुष्प देऊन कणकवलीत रेल्वे स्टेशनवर भाजपा पदाधिकारी कार्यकर्त्यांनी स्वागत केले.१८०० प्रवाशांना घेऊन ही रेल्वे कणकवलीत दाखल झाली.याठिकाणी चार एसटी बस पुढील प्रवासासाठी ठेवण्यात आल्या होत्या.देवगड तालुक्यात जाण्यासाठी दोन एसटी बस ठेवल्या होत्या त्यातून हे प्रवासी आपापल्या गावी रवाना झाले.

कणकवलीत प्रवाशांचे स्वागत भाजपा कणकवली तालुका अध्यक्ष मिलिंद मेस्त्री,सभापती मनोज रावराणे,भाजपा जिल्हा उपाध्यक्ष राजन चिके,राकेश परब,युवक जिल्हा सरचिटणीस संदीप मेस्त्री,शहर अध्यक्ष अण्णा कोदे,नगरसेवक मेघा गांगण,तालुका सदस्य प्रदीप गावडे,लोरे सरपंच अजय रावराणे,काळसुली उपसरपंच सचिन परधीये,युवा शक्ती लोरे केंद्र प्रमुख सदानंद गुरव,शुभम गुरव,दिनेश तोरसकर, महेश बागवे आदी सह कार्यकर्त्यांनी केले.यावेळी अनेक प्रवाशांनी आमदार नितेश राणे यांचे आभार मानले. मोफत रेल्वे प्रवास ही कल्पना खूपच चांगली आहे. दुपारचे जेवण,पिण्याच्या पाण्याची व्यवस्था आदी सर्वच सेवा चागल्या होत्या अशी प्रतिक्रिया प्रत्येक प्रवाशांनी दिली.