वाटद जि.प.गटात भव्य गणेश सजावट आरास स्पर्धेचे आयोजन

खंडाळा । वार्ताहर

रत्नागिरीतील तालुक्यातील वाटद जि.प.गटात भव्य गणेश सजावट आरास स्पर्धा २०२१ आयोजित करण्यात येणार आहे. मल्हार शैक्षणिक व सामाजिक संस्था संचलित सरकार मिञ मंडळ जयगड खंडाळा यांच्या वतीने प्रथमच वाटद जिल्हा परिषद गट मर्यादित भव्य गणेश सजावट आरास स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे.

या स्पर्धेतील सर्व स्पर्धकाना सहभाग प्रमाण पञक देण्यात येणार आहे. तसेच पहिल्या तीन स्पर्धकाना पारीतोषिक व सन्मान चिन्ह ,सन्मान पञ मान्यवरांच्या हस्ते देण्यात येइल स्पर्धेत जास्तीत जास्त गणेश भक्तांनी सहभागी व्हावे असे आव्हान मंडळाच्या संयोजक व मंडळाचे संस्थापक मल्हार सामाजिक व शैक्षणिक संस्था चे संंस्थापक श्री .आशिष अमिता अनंत भालेकर यांनी केले आहे.या स्पर्धेत धार्मिक भावना ,रासायनिक घटक या मध्ये नसावे ,पर्यावरण पूरक देखावा असावा , कौशल्य, नाविन्यपूर्ण पूर्ण आरास, मखर साकारून त्यात स्थापन केलेले असावे . तसेच समाज प्रबोधन करणारे असावे , मात्र कोरोना महामारीमुळे गेल्या दोन वर्षांपासून नागरिकांत उत्साह कमी झाला आहे आणि केवळ गणेशमूर्ती आणून स्थापन करण्याकडे कल वाढला आहे. त्यामुळे या कोरोना काळातही आपल्या बांधवांचे देखावे, आकर्षक सजावट करण्याचे कौशल्य कायम रहावे, त्यांना यात चालना मिळावी, म्हणून ही स्पर्धा भरविण्यात येत.

सहभागी गणेश भक्कतानी आपली नावे उदय महाकाळ मो.नंबर – ९८६००५९१२२ .श्री . शंकर पवार – ९४२२९९६१४७ . श्री दिपक चौगुले – ७७९६१६२०३० यांच्या कडे दिनांक ९/८/२०२१ पर्यत द्यावी .या स्पर्धे साठी विशेष सहकार्य शिवसेना ,युवा सेना, सागरी पोलीस ठाणे जयगड ,व प्राथमिक आरोग्य केद्र वाटद यांनी केले आहे.
ही स्पर्धा वाटद जि.प. गट मर्यादित आहे. स्पर्धेसाठी कोणतेही प्रवेश शुल्क नाही. कोरोनाचे सर्व शासकीय नियम पाळून तज्ञांद्वारे स्पर्धेचे परीक्षण करण्यात येणार आहे.