मंडणगड येथील विविध भागात समिंश्र पाऊस

मंडणगड । प्रतिनिधी

हवामान खात्याने दिलेल्या अंदाजानुसार 7 सप्टेंबर रोजी जिल्ह्यात मुसळधार पाऊस पडत असताना मंडणगड तालुक्यातील विविध भागात कमी अधिक पाऊस पडल्याची नोंद मिळाली आहे.

7 सप्टेंबर 2021 रोजी तहसिल कार्यालयाने घेतलेल्या पावसाच्या नोंदी नुसार मंडणगड महसूल मंडळात 05 मीलीमीटर इतक्या पावसाची नोंद झाली. म्हाप्रळ महसुल मंडळात 04मीलीमीटर पावसाची नोंद झाली देव्हारे महसुल मंडळात 38 मीलीमीटर पावसाची नोंद झाली तर वेसवी महसुल मंडळात सर्वाधीक म्हणजे 166 मीलीमीटर इतक्या पावासाची नोंद झाली. तालुक्यातील पावसाची एकुण सरासरी 213 मिलीमीटर इतकी आहे. सरासरी पाऊस 53 तर 7 सप्टेबंर अखेर तालुक्यात एकुण 3570 मिलीटर पावसाची नोंद झाली आहे.6 सप्टेंबर रात्री ते सकाळी सात या वेळेत वेसवी मंडलात धोधो पावूनस पडत असताना मंडणगडमध्ये मात्र शांतता होती एकीकडे ढगफुटी तर दुसरीकडे केवळ शिडकाव अशा दुहेरी परिस्थीती वातवारण तालुक्यास पहावयास मिळाले.

वेसवी महसुल मंडलात शेवरे या ठिकाणी दरड कोसळल्याची माहीती सार्वजनीक बांधकाम विभागाकडून प्राप्त झाली असून माहीती कळताच बांधकाम विभागाचे कर्मचारी जेसीबी सह शेवरी येथे दरड साफ करण्यासाठी रवाना झाल्याचे कळले आहे याचबरोबर बाणकोट रस्त्यावर पडलेली झाड वाहतूकीस अडचणी निर्माण होऊन नये म्हणून ग्रामस्थांनी स्वतःहाच बाजूला केलेली असल्याची माहीती कळली आहे.