लसीकरणाच्या शिस्तबद्ध नियोजनामुळे कोंड्ये गांव कोरोनामुक्त होण्याच्या वाटेवर !.. सभापती मनोज रावराणे

फोंडाघाट। कुमार नाडकर्णी :

ग्रामस्थांच्या पाठपुराव्यामुळे कोंड्ये गांवात लसीकरण केंद्र देण्यात आले. शिस्तबद्ध नियोजनामुळे आणि गांवात लोकांपर्यंत लसीकरणाचे महत्त्व पोहोचविल्यामुळे लसीकरण चांगल्याप्रकारे सुरू होत आहे. त्यामुळे लवकरच कोंड्ये गांव कोरोना मुक्तीच्या वाटेवर वाटचाल करील, असा विश्वास कणकवली तालुक्याचे सभापती मनोज रावराणे यांनी केंद्राच्या शुभारंभ प्रसंगी व्यक्त केला.

यावेळी ज्येष्ठ नागरिक व माजी सरपंच आण्णा तेंडुलकर यांनी, ग्रामस्थांना गांवातच लसीकरण केंद्र हवे होते. आणि आम्ही पाठपुरावा केल्यानंतर आरोग्य विभाग आणि सभापती यांनी ते मंजूर केले. याबद्दल धन्यवाद व्यक्त दिले. पत्रकार गणेश जेठे यांनी उत्कृष्ट नियोजनाबद्दल कौतुक करताना कोरोना पासून बचावासाठी आणि प्रशासकीय नियमाप्रमाणे प्रत्येकाने लसीकरण करून घेणे, आजची गरज असल्याचे स्पष्ट करून गावात केंद्र आहे.. प्रत्येकाने दोन्ही डोस पूर्ण करण्याचे आवाहन केले.

केंद्राच्या शुभारंभप्रसंगी उपसरपंच संतोष पेडणेकर, सचिन परब, बाळा भोगटे, भाऊ ठाकूर,संजय तेंडुलकर, अनंत तेली, बाबू जोईल, पोलीस पाटील मेस्त्री, अनिल मेस्त्री, शंकर तेली, शांताराम जोईल, संजय सावंत, दीपक तेली,आ.से. ठाकरे, सोनाली परब इत्यादी उपस्थित होते. कार्यक्रमाची सांगता ऋतुराज तेंडुलकर यांनी आभार प्रदर्शनाने केली. यावेळी लसीकरणासाठी ग्रामस्थांचा उत्साह दिसून येत होता….