वारकरी साहित्य परिषद तालुका शाखेचे मुख्यमंत्र्याना निवेदन

मंडणगड । प्रतिनिधी

वारकरी साहित्य परिषद तालुका शाखा मंडणगड यांच्यावतीने 3 सप्टेंबर 2021 रोजी कालकार मानधन प्रश्नासंदर्भात तहसिलदार मंडणगड यांच्या माध्यमातून राज्याचे मुख्यमंत्र्याकडे निवेदन सादर करण्यात आले.

या निवेदनानुसार गेल्या दोन वर्षांपासून कोव्हीड 19 चे महामारीमुळे भजन, किर्तन, प्रवचन या माध्यमातून होणाऱ्या समाजप्रबोधनाचे साप्ताहीक कार्यक्रम बंद असल्यामुळे कलावंतावर उपासमारीची वेळ आली आहे. याकरिता मुख्यमंत्री यांनी केलेल्या घोषणे अंर्तगत सांप्रदाईक किर्तनकार, गायक, मृदुंगाचार्य यांना मदत मिळावी तसेच त्यांच्या नावाची नोंद नसल्याने त्यांच्या नावाची नोंद घेऊन आर्थीक मदत मिळावी. वारकरी साहीत्य परिषद आंर्तगत महाराष्ट्र सरकार यांच्याकडे तालुक्यातील कलावंताची यादी सादर करीत आहेत. ह.भ.प. दीनेश पोस्टुरे, आत्माराम सुतार, दगडू बैकर, सुरेश जाधव, .योगेश पवार, बाबाजी नालवडे, जर्नादन धाडसे, दिलीप माळी, मंगेश पारदुले, शशिकांत पोस्टुरे, यांची नावे या यादीत समाविष्ठ करण्यात आली आहेत.