गुरू-शिष्याच्या नात्याचा गौरव करताना डाॅ. राधाकृष्णन यांचा वाढदिवस “शिक्षक दिन” म्हणून साजरा होतोय, हाच त्यांचा सन्मान होय! — सरपंच संतोष आग्रे.

शिक्षक दिनी उपक्रमाचे प्रणेते स्व. बापूंच्या आठवणींना उजाळा…..

फोंडाघाट। कुमार नाडकर्णी :

आज गुरु-शिष्य यांचा गौरव, हा मला लाभलेल्या शिक्षकांचा ऋणनिर्देश करण्याचा क्षण आहे.फोंडाघाट मधील शिक्षक दिनाचे संस्थापक स्व.बापू नेरुरकर यांच्या आठवणीमध्ये आजचा दिवस संपन्न करताना, त्यांच्या संस्कारांमध्ये वाटचाल करणे, हीच त्यांना आदरांजली ठरू शकेल.त्याकरिता हा उपक्रम दरवर्षी सुरू ठेवावा. यासाठी माझ्याकडून, माझ्या ग्रामपंचायतीतून सहकार्य मिळेल अशी ग्वाही सरपंच संतोष आग्रे यांनी देताना निवृत्त शिक्षक-शिक्षकेतर वर्गाला शुभेच्छा दिल्या.

सलग ४२ व्या वर्षी फोंडाघाट ग्रामस्थांतर्फे ग्रामपंचायत येथे शिक्षक दिन आणि निवृत्त शिक्षक-शिक्षकेतर वर्गाचा सत्कार सोहळा सरपंच संतोष आग्रे यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाला. यावेळी माजी सभापती सौ. सुजाता हळदीवे,जि.प.सदस्य.संजय आग्रे, केंद्रप्रमुख सुर्यकांत चव्हाण, ग्रामविस्तार अधिकारी चौलकर ,राजन चिके, आप्पा सावंत, कानडे गुरुजी, विजयसिंह पोकळे सर, विश्‍वनाथ जाधव, भरत चिके, सिद्धेश पावसकर. भालचंद्र राणे,सुभाष मर्ये,नातुगुरुजी इत्यादी मान्यवर उपस्थित होते. यावेळी शोभा सुरेश कदम (मुख्या. केंद्रशाळा फोंडा), प्रकाश नारायण पवार (हायस्कूल) अनुजा रावराणे (लोरे नं.१), भी.वा. राणे( नाटळ), प्रकाश पवार (दाजीपूर) या निवृत्त शिक्षक- शिक्षकेतर वर्गाला भेटवस्तू देऊन सन्मानित करण्यात आले.

कुमार नाडकर्णी, राजू पटेल, प्रदीप नेरुरकर, संतोष टक्के, बाळा डोर्ले,सौ सुजाता हळदिवे,प्रकाश पवार यांनी डॉ. राधाकृष्णन यांचे शिक्षकी योगदानाबद्दल, त्यांच्या मोठेपणाबद्दल सांगताना निवृत्त शिक्षकांना शुभेच्छा दिल्या. सलग ४२वर्षे शिक्षक दिन आणि फोंडाघाटातील अथवा बाहेरून येऊन गांवात शैक्षणिक सेवा देणाऱ्या निवृत्त शिक्षकांच्या सत्कार सोहळ्याबद्दल आठवणी सांगितल्या. उपक्रमाचे संस्थापक ज्येष्ठ शिक्षणप्रेमी स्व.बापू नेरूरकर यांना अभिवादन केले. निवृत्त शिक्षकांच्या कामाचे, त्यांच्या समर्पणाचे कौतुक करताना, शिक्षक चुकला तर कित्येक पिढ्या बरबाद होतील अथवा होत राहतील, त्यामुळे योग्य शिक्षक लाभणे, आवश्यक असल्याचे आणि व त्यांची जबाबदारी असल्याचे सांगितले. त्यामुळेच ते पूजनीय आहेत.स्व. बापूंनी लावलेल्या या उपक्रमाचे आज वटवृक्षात रूपांतर झाले असताना, केवळ फोंडाघाट मध्ये हा सोहळा सातत्यपूर्ण ग्रामस्थांच्या मदतीने आणि सरपंचांच्या अध्यक्षतेखाली होत आहे हे वैशिष्ट्यपूर्ण आहे. याचे महत्त्व आता युवा पिढीलाही समजल्याचे आजच्या उपस्थितीवरून दिसत असल्याने प्रत्येक क्षेत्राच्या व्याख्या जरी बदलल्या, तरी हा संस्कारक्षम उपक्रम सदैव सुरू राहील असा विश्वास सर्वांनीच व्यक्त केला.

कार्यक्रमाच्या प्रारंभी या उपक्रमाशी संलग्न दिवंगत शिक्षण- प्रेमींना श्रद्धांजली वाहण्यात आली.तसेच डाॅ. राधाकृष्णन, सानेगुरुजी आणि स्व. बापुंच्या प्रतिमेस मान्यवरांनी पुष्पहार घातले आणि दिपप्रज्वलीत केला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सुंदर पारकर यांनी तर आभार प्रदर्शन पोकळे गुरुजी यांनी केले. सोहळ्यासाठी संजय / चैतन्य नेरुरकर ,विजय रेवडेकर इ.नी विशेष परिश्रम घेतले.