परळ दापोली गाडीस म्हाप्रळ रोहीदासवाडी येथे गंभीर अपघात

चालकासह चास प्रवाशी जखमी

मंडणगड | प्रतिनिधी :

परळ येथून दापोलीकडे परतीचा प्रवास करणाऱ्या परळ दापोली एस.टी.ला ५ सप्टेंबर २०२१ रोजी पहाटे 5.00 वाजण्याच्या सुमारास राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ९६५ डी डी वर म्हाप्रळ ( रोहीदासवाडी ) या ठिकाणी अपघात झाला. अपघतात गाडीच्या चालकासह चार प्रवाशांना दुःखापत झाली त्यांच्यावर मंडणगड येथील ग्रामिण रुग्णालयात प्रथमोपचार करुन दापोली येथे पाठवण्यात आल्याची माहीती आगार व्यवस्थापक हनुमंत फडतरे यांच्याकडून प्राप्त झाली आहे.

गाडीचे चालक प्रभाकर माधवरा घुगे वय 31) यांनी मंडणगड पोलीस स्थानकात दिलेल्या फिर्यादीतील माहीतीनुसार हे आपल्या ताब्यातील परळ – दापोली गाडीने M.H. 20 BL. 3269 ने दापोली प्रवासाकरिता परळ येथून रात्री 11.00 वाजता मार्गस्थ झाले. वाटेत वरील मार्गावर प्रवास करीत असताना समोरुन येणाऱ्या चारचाकी वाहनाने हुलकावणी दिल्याने व रस्त्यावरील खड्डे वाचवण्यासाठी अचानक ब्रेक मारल्याने फिर्यादी यांनीही गाडीला ब्रेक मारला यावेळी गाडी डाव्याबाजूला रस्तालगत कंलडून अपघात झाला. यावेळी गाडीत एखुण २३ प्रवाशी प्रवास करीत होते. अपघातानंतर जखमींवर मंडणगड येथे प्रथमोपचार करुन अधिक उपचारासाठी दापोली येथे पाठवण्यात आले.

राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण व संबंधित ठेकेदार यांच्या गलथान कारभारामुळे चिंचाळी ते म्हाप्रळ या गावांचे हद्दीत रस्त्याची दुरावस्था झालेली असून समस्याकंडे पुर्ण पावसात दुर्लक्ष केलेल्या प्राधिकऱणाने वाढत्या जनक्षोभामुळे गणपतीचे आधी माती व दगड टाकून खड्डे बुजवण्याचा केलेला केविलवाणा प्रयत्न समस्या कमी करण्याचे ऐवजी त्यात भर टाकत आहे. रस्त्यावरन दुचाकी तीन चाकी व लहान चार चाकी वाहनांच्या लहान मोठ्या अपघातांची मालीका थांबलेली नाही त्यात आज एस.टी. भर पडली आहे गणशोत्सवासाठी मंडणगड व दापोली तालुक्यात दाखल होणाऱ्या गणेशभक्तांचे चिखलाने स्वागत करण्याची पक्की तयारी प्राधीकरणाने केलेली असताना एस.टी. चा अपघात समस्येची तीव्रता आणखीन अधोरेखीत होत असताना गलथान कराभारासाठी प्रसिध्द असलेले प्राधिकरण आता तरी लक्ष देणार का असा प्रश्न या निमीत्ताने पुन्हा एकदा उपस्थित झाला आहे.

जिल्हा परिषद सदस्य संतोष गोवळे करणारा 6 सप्टेंबर 2021 रोजी रस्त्यावर आंदोलन- गणेशोत्सवापुर्वी रस्ता वाहतूकीचे योग्य करावा यासाठी विविध स्तरावरुन प्राधिकरणाकडे मागणी होत असली तरी खड्डे बुजवण्यासाठी प्राधिकरणाने सप्टेंबर महिन्याचा मुर्हुत गाठला त्यात बांधकामाचे नियम पाळण्यात न आल्याने खड्डे पडलेल्या रस्यावर चिखल साम्राज्य आहे रस्त्यावर डायव्हर्शन असले तरी दिशा दर्शक फलक धोकादायक ठिकाणी बँरीकेटस इत्यादी उपाय योजना न कऱण्यात आल्याने जिल्हा परिषद सदस्य यांनी प्रांताधिकारी दापोली व तहसिलदार मंडणगड यांच्याकडे निवेदन दिले होते व रस्त्याची परिस्थिती सुधारण्याची मागणी केली होती यावर कोणत्याही उपाय योजना न झाल्याने व अपघाताची मालिका थांबलेली नसल्याचे या अपघातामुळे स्पष्ट झाल्याने उद्या 6 सप्टेंबर 2021 या रस्त्यावर आंदोलन होणार असल्याचे संतोष गोवळे यांनी माध्यमांकडे स्पष्ट केले आहे.