वनविभागाची अनधिकृत लाकूड वाहतुकीवर धडक कारवाई,५ लाख २५ हजराचा मुद्देमाल जप्त

कणकवली नांदगाव येथे करण्यात आली कारवाई

संतोष राऊळ | कणकवली :
कणकवली वनविभागाच्या वतीने विनापरवाना लाकूड वाहतुकीवर धडक कारवाई सुरू केली आहे. त्यामुळे अनधिकृत लाकूड व्यावसायिकांचे धाबे दणाणले आहेत. अशीच कारवाई नांदगाव येथे करण्यात आली. यात आंबा व शिवनचे अवैध लाकूड वाहतूक करत असताना टेम्पो व लाकूड असा तब्बल ५ लाख २५ हजार रूपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.

ही कारवाई उपवनसंरक्षक नारनवर, सहाय्यक वनसंरक्षक सावंतवाडी जलगावकर,वनक्षेत्रपाल राजेंद्र घुणकीकर यांच्या मार्गदर्शनाखाली विनापरवाना होत असलेल्या आंबा, शिवन, लाकूड वाहतुकीला नांदगाव येथे वनरक्षक शेगावे वनरक्षक सुतार वनरक्षक मणेर यांनी आंबा, शिवन अवैध लाकूड वाहतूक करत असताना नांदगाव येथे टेम्पो व लाकूड असा तब्बल 5 लाख 25 हजार रूपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.

या प्रकरणी फीरोज साटविलकर रा.नांदगाव व कादीर आब्दूल नावळेकर रा.नांदगाव यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. टेम्पो क्र. MH 07 – A J-6107मधून साग लाकडाची विनापरवाना वाहतूक होत होती. 3 सप्टेंबर रोजी वनविभागाचे पथक वनक्षेत्रपाल यांचे समावेत रात्री ची गस्त घालत असताना रात्रीचे वेळीसदर टेम्पो जप्त करून आतील लाकडासह टेम्पो वनविभागाच्या फोंडाघाट येथील विक्री आगारात आणण्यात आला. यावेळी 5 लाख रुपये किंमतीचा टेम्पो व 25000 हजार रुपये किमतीचे लाकूड जप्त करण्यात आले. ही कारवाई वनक्षेत्रपाल राजेंद्र घुनकीकर यांच्या मार्गदर्शनाखाली वनपाल अनिल जाधव यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आली. अधिक तपास फोंडा वनपाल अनिल जाधव करत आहेत.