पोलीसांनी अडखळ येथे केलेल्या कारवाईत 10 हजारांच्या खैरासह 95 हजारांची गाडी घेतली ताब्यात

मंडणगड | प्रतिनिधी :

मंडणगड पोलीस स्थानकाच्यावतीने 30 ऑगस्ट 2021 रोजी करण्यात आलेल्या कारवाईत दहा हजार रुपये किंमतीचा सोललेला खैर व 95 हजार रुपये किंमतीचा पोयाजीवो कंपनीचा टेम्पो असा 1 लाख 5 हजार रुपये किंमतीचा मुद्देमाल पोलीसांनी ताब्यात घेतला आहे.

या संदर्भात पोलीस हेड कॉन्स्टेबल महेंद्र तांदळे यांनी पोलीस स्थानकात नोंदविलेल्या तक्रारीतील माहीतीनुसार 30 ऑगस्ट रोजी सांयकाळी 4.00 वाजता मौजे अडखळ येथे आरोपीत प्रमोद सुर्वे वय (38) राहणार विसापुर मोरेवाडी ता दापोली, नजीर कडवेकर वय (30) राहणार विसापुर पाथरी ता दापोली यांनी आपल्या ताब्यातील गाडीने अँपे क्रमांक (एम.एच. झिरो. 8 डब्ल्यु 5372) या वाहनातून स्वतःच्या फायद्याकरिता दहा हजार रुपये किंमतीचे खैराचे साली काढलेले लहान मोठे ओंडके चोरी करुन विनापरवाना वाहतूक करीत असताना आढळून तसेच वाहन चालवित असताना ड्राईव्हींग लायसन न वापरता सापडून आले. म्हणून या दोघांविरोधात भा.द.वि कलम 379,34, भारतीय वन अधिनियम 1927 चे कलम 26 (1) (अ) (फ),41(2)(ख) 42 सह महावन नियमावली कलम 41 मोटार वाहन कायदा कलम 3-181 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस निरक्षक शैलजा सावंत यांच्या मार्गदर्शनााखाली अधिक तपास पोलीस हेडकॉन्स्टेबल श्री. बाणे करीत आहेत.