देव-घैसास कीर वरिष्ठ महाविद्यालय, नाटेकर-गांधी-कीर कनिष्ठ महाविद्यालय व पटवर्धन हायस्कूलमध्ये राष्ट्रीय क्रीडा दिन

जाहिरात-2

रत्नागिरी- भारत शिक्षण मंडळाचे, देव-घैसास-कीर वरिष्ठ महाविद्यालय, नाटेकर -गांधी-कीर कनिष्ठ महाविद्यालय व पटवर्धन हायस्कूल यांच्या संयुक्त विद्यमाने राष्ट्रीय क्रीडा दिन साजरा करण्यात आला.

दीपप्रज्वलनाने कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. त्यानंतर क्रीडा साहित्याचे पूजन करण्यात आले. या कार्यक्रमातील प्रमुख अतिथी म्हणून भारत शिक्षण मंडळाचे क्रीडा विभाग प्रमुख चंद्रकांत घवाळी उपस्थित होते.त्यांनी राष्ट्रीय क्रीडा दिनाच्या शुभेच्छा दिल्या. यावेळी पटवर्धन हायस्कूलचे मुख्याध्यापक राजेंद्र कांबळे ,वरिष्ठ महाविद्यालयाच्या प्रभारी प्राचार्या सौ. मधुरा पाटील यांनीही शुभेच्छा दिल्या.

प्रमुख वक्ते म्हणून पटवर्धन हायस्कूलचे क्रीडा शिक्षक वेल्हाळ मॅडम व श्रीपाद गुरव यांनी आभासी पद्धतीने क्रीडा दिनाचे महत्व पटवून दिले.यावेळी वरिष्ठ महाविद्यालयाचे प्रा.विनय कलमकर, पटवर्धन हायस्कूलचे शिक्षक वसंत आर्डे , श्री.साळुंखे उपस्थित होते.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा.वैभव घाणेकर यांनी केले तर आभार प्रा. वैभव कीर यांनी मानले.