फोंडाघाट मंडळ कार्यालयात तलाठी पंडीत आणि अरुणा जयानावर सन्मानित !

फोंडाघाट । कुमार नाडकर्णी : पंडितभाऊंच्या अनुभवाचे मार्गदर्शन मिळाल्याने आणि त्यांच्या समर्पण भावनेने काम करण्याच्या स्वभावामुळे फोंडाघाट सारख्या संवेदनशील मंडळ कार्यालयात काम करणे सोपे झाले. आज त्यांच्या सत्कारप्रसंगी त्यांना मिळालेल्या बढतीचा उपयोग जनसामान्यांना होईल,अशी अपेक्षा मंडल अधिकारी निलीमा प्रभुदेसाई यांनी व्यक्त करून, त्यांचा श्रीफळ, शाल, पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला आणि शुभेच्छा दिल्या. तसेच नवीन तलाठी अरुणा जयानावर यांना लोकाभिमुख कामासाठी शुभेच्छा देताना स्वागत केले.

बढती मिळाल्याप्रित्यर्थ तलाठी अर्जुन पंडित यांना कार्यमुक्ती आणि नवीन तलाठी अरुणा जयानावर यांचा कार्यालयीन स्वागत सोहळा मंडळ कार्यालय फोंडाघाट येथे पार पडला.यावेळी सर्वश्री तांबोसकर (करंजे), बचाटे (हरकुळ खुर्द), सलाम (करूळ), लांबर (घोणसरी) इत्यादी तलाठी आणि कोतवाल पांडू राणे, दिलीप कदम,नारकर,भूषण कदम, चंदू तेली,अंकिता सावंत, सायली वाळवे इत्यादी कर्मचारी उपस्थित होते. त्यांनाही प्रोत्साहनपर सन्मानित करण्यात आले.

यावेळी सहकारी तलाठी लांबर यांनी पंडित यांच्या कार्यपद्धतीबद्दल गौरवोद्गार काढून शुभेच्छा दिल्या. तर पंडित यांनी सर्व सहकारी, महसूल अधिकारी आणि ग्रामस्थ यांनी दिलेल्या सहकार्याबद्दल धन्यवाद व्यक्त केले……

जाहिरात4