कोकण विकास समितीची मागणी मान्य, गणपती विशेष गाड्यांना मिळणार थांबे

जाहिरात-2

खेड | प्रतिनिधी

कोकण विकास समितीच्या मागणीनुसार गणेशोत्सवामध्ये जवळ जवळ सर्वच स्थानकावर गाड्यांना थांबे मिळणार असल्याने प्रवाशी वर्गाला दिलासा मिळाला आहे.

०१२५७ / ०१२५८ लोकमान्य टिळक टर्मिनस सावंतवाडी, ०१२५९ / ०१२६० पनवेल सावंतवाडी, ०१२६३ / ०१२६४ दादर रत्नागिरी आणि ०१२६७ दादर मंगळुरू ह्या गाड्यांना ०१२६१ / ०१२६२ पनवेल चिपळूणला वीर आणि चिपळूण दरम्यानचे सापे वामने, करंजाडी, विन्हेरे, दिवाणखवटी, कळंबणी, खेड आणि अंजणी हे सर्व थांबे तर रोहा, कोलाड, माणगाव, वीर आणि पुढे सर्व थांबे देण्यात आले आहेत. वरील धावणाऱ्या सर्व गाड्या संपूर्ण आरक्षित आहेत. प्रवाशांनी आरक्षण करूनच प्रवास करावा आणि रेल्वे स्थानकाचे उत्पन्न वाढवावे असे आवाहन करण्यात आले आहे.