खेडच्या प्रशांत सावंतयांची आंतरराष्ट्रीय क्रिडा स्पर्धेसाठी निवड

जाहिरात-2

खेड | प्रतिनिधी :
क्रीडा रत्न राष्ट्रीय खेळाडू श्री.प्रशांत महेंद्र सावंत यांची .२४ ते २६ ऑगस्ट रोजी ए टी टी एफ इंटरनॅशनल पॅरा ओपन गेम्स २०२१ मालदीव येथे होणाऱ्या दिव्यांग खेळाडूंच्या आंतराष्ट्रीय क्रिडा स्पर्धे करीता भारतीय संघात निवड झाली आहे.

प्रशांत सावंत यांनी गेली दहा वर्षे दिव्यांग खेळाडूंच्या राज्य व राष्ट्रीय स्पर्धांन मध्ये सहभाग घेऊन अनेक पारितोषिके मिळविली आहेत.त्यांनी रत्नागिरी जिल्ह्यातील दोनशे हुन अधिक महिला व पुरुष दिव्यांग खेळाडूंना एकत्र करून खेळाडूंनसाठी दिव्यांग क्रिडा स्पर्धाचे एक नवीन व्यासपीठ उपलब्ध करून दिले आहे.दिव्यांग खेळाडूंन साठी विविध क्रिडा स्पर्धा,व शिबिराचे आयोजन करून खेळाडूंना राज्य व राष्ट्रीय क्रिडा स्पर्धांन मधून सहभागी होण्यासाठी ते नेहमीच प्रयत्न करीत आहेत.त्यांच्या क्रिडा क्षेत्रातील याच कार्याची दखल महाराष्ट्र शासनमान्य महाराष्ट्र अपंग कर्मचारी अधिकारी संघटना शाखा रत्नागिरी यांनी त्यांना रत्नागिरी जिल्हा अपंग गुणिजन या पुरस्काराने सन्मानित केले आहे.तसेच खेळाडूंन साठी असणारा मानाचा क्रिडा व युवक सेवा संचालनालय महाराष्ट्र राज्य पुणे. जिल्हा क्रिडा अधिकारी कार्यालय रत्नागिरी द्वारा रत्नागिरी जिल्हा गुणवंत खेळाडू जिल्हा क्रिडा पुरस्काराने देखील सन्मानित करण्यात आले आहे.तसेच कंझुमर राईट्स ऑर्गनाईझेशन महाराष्ट्र राज्य यांनी देखील प्रशांत सावंत यांच्या कार्याची दखल घेत राज्यस्तरीय आदर्श क्रीडा रत्न या पुरस्कारा त्यांना सन्मानित केले आहे.

रत्नागिरी जिल्ह्यातील पहिलाच दिव्यांग खेळाडू भारतीय संघाचे प्रतिनिधित्व करणार आहे या मुळे जिह्यातील दिव्यांग खेळाडूंन मध्ये एक आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे प्रशांत सावंत यांच्या भारतीय संघात झालेले निवडीबद्दल महाराष्ट्र असोसिएशनचे सचिव श्री.सुहास मोरे, श्री.अतुल धनवडे,श्री.सुनिल शिंदे ,श्री.नारायण मडके,श्री.अनिल भेकरे, श्री.सचिन खेडेकर यांनी अभिनंदन केले व पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.