माजी केंद्रीय मंत्री सुरेश प्रभूंच्या माध्यमातून विद्यार्थिनींना सायकल वाटप

गोवा विमानतळ प्राधिकरण सीएसआर निधीतून वितरण

सावंतवाडी । प्रतिनिधी :

भाजप नेते माजी केंद्रीय मंत्री तथा खासदार सुरेश प्रभू यांच्या पुढाकारातून आज माजगाव हायस्कूल मधील १० मुलींना सायकलचे वाटप करण्यात आले. गोवा विमानतळ प्राधिकरण यांच्या सीएसआर निधीतून हे वितरण केले.आज काझी शहाबुद्दीन हॉलमध्ये हा कार्यक्रम घेण्यात आला. यावेळी नगरसेवक आनंद नेवगी, दिपाली भालेकर,चराठा ग्रामपंचायत सदस्य अमित परब,अजय सावंत,परिणीता वर्तक, दिलीप भालेकर,दादू कविटकर आदी उपस्थित होते.

मानव साधन विकास संस्था संचलित परिवर्तन केंद्र यांच्या संकल्पनेतून आणि गोवा विमानतळ प्राधिकरण यांच्या सीएसआर निधीतून सायकल बँक अंतर्गत जनशिक्षण संस्थान सिंधुदुर्गच्या माध्यमातून जिल्ह्यात अनेकांना सायकलचे वितरण करण्यात येत आहे. आज सावंतवाडी येथे वाटप केले आहे.संपूर्ण जिल्ह्यात आतापर्यंत या संस्थेच्या माध्यमातून १ हजार सायकल वाटप करण्यात आले आहेत.असेही यावेळी सांगण्यात आले.