जिल्ह्यातील 5 पोलीस अधिकाऱ्यांच्या झाल्या बदल्या

रत्नागिरी । प्रतिनिधी

रत्नागिरी जिल्ह्यातील ५ पोलीस अधिका-यांच्या नुकत्याच बदल्या झाल्या आहेत.

या बदल्यांमध्ये १ सहाय्यक पोलीस निरीक्षक व ४ पोलीस उपनिरीक्षक यांचा समावेेेश आहे. जिल्ह्यातील कालावधी पूर्ण झाल्यानंतर अपर पोलीस महासंचालक, मुुंबई यांच्याकडून ह्या बदल्यांचे आदेश रत्नागिरी पोलीस दलाला प्राप्त झाले आहेत.
रत्नागिरी ग्रामीण येथे सहाय्यक पोलीस निरीक्षक शरद पवार यांची ठाणे शहर याठिकाणी बदली झाली आहे. पोलीस उपनिरीक्षक रत्नागिरी कंट्रोल येथे असलेले शांताराम महाले यांची कोकण परिक्षेत्र येथे बदली झाली आहे तर पैरवी अधिकारी जिल्हा कोर्ट येथे असलेले रोहन दणाणे यांची पोलीस प्रशिक्षण केंद्र, तुरर्ची सांगली येथे बदली झाली आहे. लांजा येथे कार्यरत असणा-या श्वेता पाटील यांची कोल्हापूर परिक्षेत्र येथे बदली झाली आहे तर संगमेश्वर येथे कार्यरत असणा-या प्राची पवार यांची पुणे शहर येथे बदली झाली आहे.

सर्व बदली झालेल्या अधिका-यांचे जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. मोहितकुमार गर्ग यांनी अभिनंदन व शुभेच्छा दिल्या आहेत.