परदेशी पर्यटकांना आढळलेले पडवणे बीचवर जखमी अवस्थेत कासव

देवगड : 

काल २६ जुलै २०२१ रोजी पडवणे बीच वर परदेशी पर्यटक जोसेफ कोबुन व थॉमस यांना जखमी कासव आढळले त्यांनी वनविभाग अधिकारी मा.लिमये साहेब यांना संपर्क साधला व त्यानंतर सर्व सूत्र हलून वनविभाग सावंतवाडी उपवनसंरक्षक यांना फोनवरून संपर्क साधला गेला व त्यानंतर कणकवली वनविभागाचे वनक्षेत्रपाल श्री. घुणकीकर यांनी घटनास्थळी पडवणे येथे भेट दिली. त्याचवेळी महाड – चिपळूण येथे रेस्क्यू ऑपरेशन साठी आलेल्या पुणे येथील रेस्क्यू टिम आपले काम आटोपून कोल्हापूरला जाण्यासाठी निघालेली होती.

सदर टिम ही ॲनिमल रेस्क्यू चॅरिटेबल ट्रस्ट ची पुणे बावधन येथील एक रेस्क्यू टिम होती. त्यांनी पडवणे येथे जाऊन जखमी ऑलिव्ह रिडले कासवावर त्वरीत उपचार केले. या कासवाचा पुढील एक डावा पाय नव्हता व मागील उजवा पाय देखील कट झाला होता. तसेच डोळ्याला छोटीशी जखम झाली होती. या ॲनिमल रेस्क्यू टिम मध्ये तुहिन सातारकर , डाॅ.निकिता मेहता , विश्वेश महाजन, हर्षद नागवे ,निखिल पाटील, नरेश चांडक यांचा समावेश होता.त्यांच्यासोबत या कणकवली देवगड क्षेत्राचे वनपाल श्री. मुळे साहेब होते . त्यांनी सदर कासव व्यवस्थित झाल्यावर आज सकाळी तारामुंबरी येथील बीच वर सोडण्याचा प्रयत्न केला.परंतु समुद्राचे रौद्र रूप व उच्चतम भरती बघून ओहोटीच्या काळात सायंकाळी चारच्या सुमारास सोडण्याचा निर्णय घेतला .

परंतु दरम्यान च्या काळात रेस्क्यू टिम ला देवगड येथे फायबर पात उपलब्ध झाल्याने सदर कासव नौका मालक ललितेश खडपकर यांच्या फायबरच्या पातीने देवगड बंदर समोरील समुद्रात सुखरूप पणे सोडण्यात आले. यावेळी सदर टिमला अवि खडपकर, रुपेश कुबडे यांनी तर तारामुंबरी येथील भैरवनाथ बचत गटाच्या महिला सौ.प्रियांका तारी , प्रियांका खवळे तसेच कासव मित्र अक्षय खवळे ,दिपक खवळे व हितेश खवळे आणि तारामुंबरी कांदळवन समिती सदस्य लक्ष्मण तारी यांनी सर्वतोपरी सहाय्य केले. यावेळी तारामुंबरी कांदळवन प्रकल्प समन्वयक योगिता शेरे या देखील उपस्थित होत्या. यावेळी स्थानिक जनतेने याबद्दल ॲनिमल रेस्क्यू टिम पुणे – बावधनचे व त्यांना सहकार्य करणाऱ्या सर्व मंडळीचे कौतुक केले.

जाहिरात4