सावंतवाडी तालुक्यात कोरोना रुग्णसंख्येत घट

शनिवारी नवे ४७ रुग्ण । शहरात केवळ १३

सावंतवाडी । प्रतिनिधी :
सावंतवाडी तालुक्यातील कोरोना रुग्णांच्या संख्येत गेल्या काही दिवसांत घट झालेली पहायला मिळत असून शनिवारी केवळ ४७ नव्या रुग्णांची नोंद झाली. सावंतवाडी शहरात १३ नवे रुग्ण आढळले असून ग्रामीण भागात केवळ ३४ नवे रुग्ण आढळले आहेत. यामुळे सावंतवाडी तालुक्यातील आतापर्यंतची संख्या ५ हजार १९५ इतकी झाली आहे.
दरम्यान, शनिवारी प्राप्त अहवालानुसार सावंतवाडी तालुक्‍यात एकूण ४७ नवे रुग्ण सापडले असून यातील शहरात सापडलेल्या रुग्णांमध्ये सर्वाधिक सालईवाडा व झिरंग प्रत्येकी ३, खासकीलवाडा व मोरडोंगरी प्रत्येकी १ तर जुनाबाजार व उर्वरित सावंतवाडी शहरातील २ जणांचा समावेश आहे.

तर ग्रामीण भागात सापडलेल्या ३४ रुग्णांमध्ये सर्वाधिक तळवणे ५, बांदा, आजगांव, सांगेली व माजगाव प्रत्येकी ३, मळगांव, वेत्ये, कारिवडे व दाणोली प्रत्येकी २ तर इन्सुली, डोंगरपाल, चराठे, गेळे, किनळे, सोनुर्ली, निगुडे व माडखोल येथील प्रत्येकी एका रुग्णाचा समावेश आहे.

दरम्यान, सावंतवाडी तालुक्यातील आतापर्यंतची संख्या ५ हजार १९५ इतकी झाली आहे. सद्यस्थितीत ४६५ रुग्ण सक्रिय असून आतापर्यंत ४५७४ रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. तर तालुक्‍यातील एकूण कोरोना बळींची संख्या १३५ वर गेली आहे. याबाबतची माहिती तालुका आरोग्य अधिकारी डॉ. वर्षा शिरोडकर यांनी दिली आहे.

जाहिरात4